Nawab Malik: 70 हजाराचा शर्ट, 2 लाखांचे बूट.. सगळं आलं कुठून?, मलिकांचे समीर वानखेडेंवर नवे गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: Nawab Malik Vs Sameer Wankhede: महाराष्ट्रात क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यातील संघर्ष अद्यापही नाव घेत नाहीए. ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

यावेळी नवाब मलिक म्हणाले की, वानखेडे यांनी घातलेल्या शूजची किंमत तब्बल 2 लाख रुपये आहे तर त्यांच्या शर्टची किंमत ही 70 रुपयांपेक्षा जास्त आहे.

पाहा नवाब मलिक यांनी नेमके काय-काय आरोप केले

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘त्या’ केसमधून वानखेडेंनी केली कोट्यवधीची वसुली’

नवाब मलिक म्हणाले, ‘2020 मध्ये वानखेडे आल्यानंतर एनसीबीने एक गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणात सारा अली खानला बोलावण्यात आले होते, त्याच प्रकरणात श्रद्धा कपूरला बोलावण्यात आले होते, दीपिका पदुकोणलाही याच प्रकरणात बोलावण्यात आले होते, संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला बोलावण्यात आले होते.’

ADVERTISEMENT

‘आजपर्यंत तो खटला बंद करण्यात आलेला नाही. दुसरीकडे आरोपपत्रही दाखल करण्यात आलेलं नाही, या प्रकरणात असं काय आहे की, 14 महिने झाले तरीही ही केस बंद होत नाही. याचं कारण म्हणजे याच प्रकरणात हजारो कोटींची वसुली करण्यात आली आहे. मालदीवमध्ये ही खंडणी वसुली करण्यात आली आहे.’ असा थेट आरोप मलिकांनी वानखेडेंवर केला आहे.

ADVERTISEMENT

‘NCB कडून वानखेडेंच्या मालदीव दौऱ्याची सखोल चौकशी व्हावी’

मलिक पुढे म्हणाले, ‘आम्ही दोन फोटो शेअर केले आहेत, एक मालदीवचा आणि एक दुबईचा. वानखेडे म्हणतात की, मी कधीच दुबईला गेलो नव्हतो तर बहिण दुबईला गेली होती. तुम्ही मालदीवमध्ये होता. मालदीवची ट्रीप काही स्वस्त नाही. एवढे लोक गेले तर 20-30 लाख खर्च येतो. एनसीबीच्या विजिलेंस टीमने याची चौकशी करावी. हा खर्च कोणत्या खात्यातून करण्यात आला आहे याची चौकशी करावी.’ अशी मागणी मलिकांनी यावेळी केली आहे.

‘समीर वानखेडे 70 हजार रुपये किंमतीची शर्ट वापरतात’

‘ज्ञानेश्वर सिंग आणि इतर अधिकारी हे टीव्हीवर येतात. पण कोणत्याही अधिकाऱ्याचा शर्ट हा 1000-500 रुपयांपेक्षा महाग नाही. पण समीर वानखेडेंचा शर्ट हा 70 हजार रुपये किंमतीचा का असतो? दररोज नवे कपडे परिधान करुन येतात हे तर मोदी साहेबांच्या देखील पुढे निघून गेले आहेत.’

‘त्यांची पँट लाख रुपयांची, पट्टा दोन लाख रुपयांचा, शूज अडीच लाख रुपयांचे. घड्याळ 50-25 लाखांचे… या सगळ्या दिवसात त्यांनी जे कपडे परिधान केलेले आहेत त्याची एकूण किंमतच 5-10 कोटींची आहे.’ असा दावा मलिकांनी केला आहे.

‘इमानदार अधिकारी 10 कोटींचे कपडे परिधान करु शकतो?’

‘इमानदार अधिकारी काय 10 कोटींचे कपडे परिधान करु शकतो? कोणताही शर्ट त्यांनी पुन्हा परिधान केला आहे हे आम्हाला पाहायला मिळालं नाही. यापेक्षा इमानदार कोणीही असू शकत नाही जो दोन लाख रुपये किंमतीचे शूज दररोज परिधान करेल.’

‘मी आजही माझ्या बोलण्यावर ठाम आहे. समीर वानखेडेने हजारो-कोटींची वसुली केली आहे. घोटाळे केले आहेत. याची चौकशी झाली पाहिजे. वसुली सुरुच आहे. असं म्हटलं जात आहे की, नवाब मलिक हे प्रश्न विचारत आहेत. त्यांना बोलण्यापासून रोखलं जावं.’

वानखेडेवर आरोप करताना मलिक म्हणाले, ‘लुई वेटॉनच्या बूटाची किंमत प्रत्येकी दोन लाख रुपये आहे. असे शूज ते कायम बदलत राहतात. बरबरीच्या शर्ट जर आपण पाहिला तर त्याची किंमत 50 हजार रुपयांपासून पुढे सुरू होते तर टी-शर्टची किंमत 30,000 रुपयांपासून सुरू होते.’

…तर मुख्यमंत्री असतानाच कारवाई का केली नाही?; नवाब मलिकांचा फडणवीसांना सवाल

‘जेएनपीटी बंदरावर 51 टन अफीमचं बी’

‘महाराष्ट्राच्या जेएनपीटी बंदरावर तीन कंटेनरमध्ये 51 टन पॉपसीड (अफीमचे बी) हे मागील 15 दिवसापासून बंदरावरच आहे. याप्रकरणी आपण केस का दाखल केली नाही? एनडीपीएसची केस का दाखल झाली नाही? भयंकर खेळ हा या देशात सुरु आहे.’ असं म्हणत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंसह केंद्रातील भाजप सरकारवर देखील टीका केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT