उत्तर प्रदेशात स्वतः प्रचाराला जाणार, समाजवादीसोबत निवडणूक लढवणार-शरद पवार

जाणून घ्या आणखी शरद पवार यांनी काय म्हटलं आहे
शरद पवार
शरद पवार

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर प्रदेशसह तीन राज्यात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. एवढंच नाही तर लवकरच आपण उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार असल्याचंही शरद पवार यांनी यावेळी जाहीर केलं.

शरद पवार
गोव्यात होणार का महाविकास आघाडीचा प्रयोग? संजय राऊत यांनी दिलं उत्तर म्हणाले....

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि इतर काही छोट्या-मोठ्या पक्षांसोबत आघाडी करून निवडणुकीला सामोरा जाणार आहे. मी स्वतःही उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेला बदल हवा आहे. निवडणुकीत जनता उत्तर प्रदेशात बदल घडवून आणले असा विश्वास मला आहे. ' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मुंबईत आज शरद पवारांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नवाब मलिक आणि इतर नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

शरद पवार
वीर सावरकरांना मराठी माणूस कधीही विरोध करूच शकत नाही, जो वाद झाला तो दुर्दैवी-शरद पवार

योगी सरकार धार्मिक तेढ पसरवणारं आहे असंही शरद पवार म्हणाले. 'मी सोमवारी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं त्यांनी उत्तर प्रदेशातील 80 टक्के जनता आपल्यासोबत आणि 20 टक्के जनता विरोधात आहे असं म्हटलं. ते 20 टक्के नागरिक कोण? याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. योगी आदित्यनाथ नेमकं कुणाबद्दल बोलत होते? राज्याचा मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो तो कोणत्याही एका समूहाचा नसतो. त्यामुळे उत्तर प्रदेशात एका धर्माच्या विचारसरणीवर सुरू असलेलं सरकार बाजूला सारण्याची गरज आहे. देशात सर्वधर्म समभाव ही भावना बळकट करायची असेल तर उत्तर प्रदेशातून भाजपला सत्तेबाहेर करावं लागेल असंही वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. पुढील आठवड्यात आम्ही सर्व उत्तर प्रदेशमधील प्रचारात सहभागी होऊ. उत्तर प्रदेशमधील परिस्थिती खूप बदलली आहे. असंही पवारांनी नमूद केलं

गोव्यात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. गोव्यात काही ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायची होती त्याची यादी आम्ही इतर दोन्ही पक्षांना दिलीय. पुढील दोन दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in