नॉन-व्हेजचे फोटो टाकल्याने सुप्रिया सुळे ट्रोल; युजर्सचा पोस्टवरती कमेंटचा पाऊस
मुंबई: राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सोशियल मीडियावरती फारच सक्रिय असतात. त्या कुठेही गेल्या तरी त्या सोशियल मीडियावरती व्यक्त होत असतात. सध्या त्यांना ते व्यक्त होणं कुठेतरी महागात पडलेलं दिसत आहे. कारण एक दिवसापूर्वी सुप्रिया सुळेंनी आपल्या सोशियल मीडिया अकाऊंटवरती नॉन व्हेज खाल्याचे फोटो टाकले होते. त्यावरुन आता त्यांना ट्रोल […]
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सोशियल मीडियावरती फारच सक्रिय असतात. त्या कुठेही गेल्या तरी त्या सोशियल मीडियावरती व्यक्त होत असतात. सध्या त्यांना ते व्यक्त होणं कुठेतरी महागात पडलेलं दिसत आहे. कारण एक दिवसापूर्वी सुप्रिया सुळेंनी आपल्या सोशियल मीडिया अकाऊंटवरती नॉन व्हेज खाल्याचे फोटो टाकले होते. त्यावरुन आता त्यांना ट्रोल केलं जात आहे. त्यांच्या त्या फोटोंवरती अनेक कमेंट येत आहेत. कोणी श्रावण महिन्याचं कारण देतंय तर कोणी विनायक मेटेंच्या निधनाचं कारण देत कमेंट करत आहेत.
सुप्रिया सुळेंनी काय पोस्ट केली आहे?
सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदास संघाच्या खासदार आहेत. त्यांच्या मतदार संघात इंदापूर नावाचं गाव आहे तिथल्या एका हॉटेलमधले फोटो सुप्रिया सुळेंनी आपल्या फेसबूकवरती शेअर केले. ”हॉटेल वर्धिनीमधील खरोखरच स्वादिष्ट जेवण” अशा आशयाचं कॅप्शन देखील त्यांनी त्या फोटोंना दिलं आहे. या फोटो टाकताच अनेकांनी त्यावरती कमेंट केल्या आहेत.
युजर्सनी सुप्रिया सुळेंच्या पोस्टवरती काय कमेंट केल्या आहेत?
सुप्रिया सुळेंनी पोस्ट टाकताच अनेकांच्या भावना दुखावलेल्या दिसत आहेत. एका युजर्सने कमेंट करताना म्हटले ”सुप्रियाताई हिंदु धर्मातील श्रावण महिना आहे. तुम्ही पाळत नाहीत माहिती आहे पण अस सोशल मीडियावर पोस्ट करुन तुम्ही किती कट्टर नास्तिक आहात हे सिध्द करताय. असो….” अशा आशयाची कमेंट केली आहे.
दुसऱ्या युजर्सने लिहिले ”विनायकराव मेटे तुमचे एके काळचे सहकारी होते. मराठवाडा शोककळेत असताना आज तुम्ही मात्र मटणावर ताव मारताय. मृत्युचे दु:ख पाळण्याचं साधं सौजन्यही तुमच्याकडे नाही!”