NEET-UG परीक्षेच्या निकालाचा मार्ग मोकळा; 16 लाख विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

NEET-UG परीक्षेचा रिझल्टची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. सुप्रीम कोर्टाने परीक्षा देणाऱ्या 16 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने बॉम्बे हायकोर्टाच्या त्या आदेशावरही रोख लावली आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. बॉम्बे हायकोर्टाच्या या निर्णयामुळेच रिझल्ट खोळंबला होता.

बॉम्बे हायकोर्टाच्या ऑर्डरवर रोख लावत सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की दोन विद्यार्थ्यांसाठी परीक्षाचा निकाल थांबवला जाऊ शकत नाही. सोळा लाख विद्यार्थी निकालाची वाट बघत आहेत. अशावेळी तो निकाल लागणं महत्त्वाचं आहे. सुनावणीच्या दरम्यान न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले की, निकाल रोखता येणार नाही या मुद्द्याशी आम्ही सहमत आहोत. मात्र दोन विद्यार्थ्यांचं हितही जपलं पाहिजे, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. निरीक्षकाने चूक मान्य केली आहे. अशा परिस्थितीत लाखो विद्यार्थ्यांना निकालाच्या प्रतीक्षेत ठेवता येणार नाही. आम्ही तुम्हाला निकाल जाहीर करण्याची संमती देत आहोत. या दोन विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्हाला मार्ग शोधावा लागेल. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर न्यायालयाने एनटीएला नोटीस बजावून त्यांचा जबाब मागवला आहे. त्यावर दिवाळीनंतर सुनावणी होणार आहे.

NEET-UG परीक्षेच्या निकालाबाबत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या निर्णयाला बॉम्बे हायकोर्टात आव्हान देण्यात आलं. दोन विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यावी असं केंद्राने म्हटलं. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे चुकीचा आदर्श निर्माण होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे संपूर्ण परीक्षेचा निकाल थांबला आहे. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास उशीर झाला तर एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीचएमएस या पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब होईल. भविष्यात अशा घटना होऊ नयेत असंही कोर्टाने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश एनव्ही रमण यांच्याकडे लवकर सुनावणीची मागणी केली होती. ते म्हणाले की उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे NEET चा निकाल जाहीर करण्याला स्थगिती देण्यात आली आहे. वास्तविक बॉम्बे हायकोर्टाने दोन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र NEET परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निकालाला विलंब लागत होता. मात्र आता सोळा लाख विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे दिलासा मिळाला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT