शेजारी राहणाऱ्या पुरुषाकडून विवाहितेचा विनयभंग; पतीने विरोध केल्यानंतर थेट डोळाच फोडला अन्...

मुंबई तक

वृत्तानुसार, आरोपीने महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला आणि तिच्या पतीने या सगळ्याला विरोध केल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. या हाणामारीत पीडित पतीचा डोळा फोडल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

पतीने विरोध केल्यानंतर थेट डोळाच फोडला अन्...
पतीने विरोध केल्यानंतर थेट डोळाच फोडला अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शेजारी राहणाऱ्या पुरुषाकडून विवाहितेचा विनयभंग

point

पतीने विरोध केल्यानंतर थेट डोळाच फोडला अन्...

Crime News: पत्नीचा विनयभंग होत असताना त्याला विरोध करणाऱ्या पतीसोबत निर्दयी कृत्य करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. वृत्तानुसार, आरोपीने महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला आणि तिच्या पतीने या सगळ्याला विरोध केल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. या हाणामारीत पीडित पतीचा डोळा फोडल्याची माहिती आहे. संबंधित प्रकरण हे बिहारच्या पाटणामधील बिहटा येथील आहे. येथील सदीसोपूरमधील रहिवासी असलेल्या महिलेसोबत ही धक्कादायक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. 

शेजारच्या पुरुषाकडून महिलेचा विनयभंग 

या घटनेनंतर, पीडित महिलेने तिच्या जखमी पतीसह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पीडितेने तिच्या शेजारी राहणाऱ्या कुंदन नटवर आपल्या पतीचा डोळा फोडल्याचा आरोप केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला आहे. त्यानंतर, पोलिसांनी गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. 

हे ही वाचा: ठाणे: प्रवाशाचा फोन हिसकावून धावत्या ट्रेनमधून मारली उडी; चोरट्यामुळे तरुणाचा तोल गेला अन् ट्रेनच्या चाकाखाली पाय चिरडला गेला

रागाच्या भरात पतीचा डोळाच फोडला.. 

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणाने आरोप केला की कुंदन नटने त्याच्या पत्नीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, महिलेने तिच्या पतीला याबद्दल सांगितलं. संतापलेल्या पतीने आरोपींच्या या कृत्याचा विरोध केला आणि त्यावेळी आरोपींसोबत त्याचा मोठा वाद झाला. नंतर, रागाच्या भरात आरोपी कुंदनने त्याच्या पाच साथीदारांसोबत मिळून तरुणाला बेदम मारहाण केली आणि या हाणामारीत पीडित तरुणाचा डोळा फोडण्यात आला. 

हे ही वाचा: महाराष्ट्र: 38 वर्षीय विवाहित पुरुषाचं शेजारच्या 23 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम, नकार सहन न झाल्याने केला खून

पोलिसांनी दिली माहिती

पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच, त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जात आहे. घटनेनंतर, प्रकरणातील सर्व आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी छापे टाकले जात आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp