ठाणे: प्रवाशाचा फोन हिसकावून धावत्या ट्रेनमधून मारली उडी; चोरट्यामुळे तरुणाचा तोल गेला अन् ट्रेनच्या चाकाखाली पाय चिरडला गेला

मुंबई तक

धावत्या ट्रेनमध्ये एका चोराने 30 वर्षीय प्रवाशाचा मोबाईल हिसकावून ट्रेनमधून उडी मारली. या धक्क्यामुळे पीडित तरुणाचा तोल गेला आणि तो रेल्वे रूळावर पडला. दुर्दैवाने यामध्ये त्याचा डावा पाय ट्रेनच्या चाकाखाली चिरडला गेला आणि त्यामुळे गुडघ्यापासून त्याचा पाय कापावा लागला.

ADVERTISEMENT

तोल गेला अन् ट्रेनच्या चाकाखाली पाय चिरडला गेला
तोल गेला अन् ट्रेनच्या चाकाखाली पाय चिरडला गेला
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रवाशाचा फोन हिसकावून धावत्या ट्रेनमधून मारली उडी

point

चोरट्यामुळे तरुणाचा तोल गेला अन् ट्रेनच्या चाकाखाली पाय चिरडला गेला

ठाणे: ठाण्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. धावत्या ट्रेनमध्ये एका चोराने 30 वर्षीय प्रवाशाचा मोबाईल हिसकावून ट्रेनमधून उडी मारली. या धक्क्यामुळे पीडित तरुणाचा तोल गेला आणि तो रेल्वे रूळावर पडला. दुर्दैवाने यामध्ये त्याचा डावा पाय ट्रेनच्या चाकाखाली चिरडला गेला आणि त्यामुळे गुडघ्यापासून त्याचा पाय कापावा लागला. इतकेच नव्हे तर, जखमी तरुणाच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. 

आरोपी तरुणाला अटक 

संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर, चोराचा शोध घेण्यास सुरूवात झाली. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात आले. याच फुटेजच्या मदतीने कल्याण जीआरपीने काही तासांतच 27 वर्षीय कैलाश बाळकृष्ण जाधव या आरोपी तरुणाला अंबरनाथ येथील त्याच्या घरातून अटक केली. त्यानंतर, आरोपीवर खुनाचा प्रयत्न आणि दरोडा यासह बऱ्याच  गंभीर कलमांखाली आरोप लावण्यात आले आहेत. 

हे ही वाचा: महाराष्ट्र: 38 वर्षीय विवाहित पुरुषाचं शेजारच्या 23 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम, नकार सहन न झाल्याने केला खून

नेमकं काय घडलं? 

जीआरपी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रितेश राकेश येरुणकर अशी पीडित तरुणाची ओळख समोर आली असून तो रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ठाणे स्थानकावरून बदलापूरला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चढला. त्यानंतर, त्याने आपल्या हातात त्याचा मोबाईल घेतला. रात्री 11:45 वाजता ट्रेन अंबरनाथ स्थानकावर आली. ट्रेन स्टेशनवरून निघत असताना, आरोपी तरुण ट्रेनमध्ये चढला आणि रितेशच्या हातातील फोन हिसकावून घेतला. नंतर, ट्रेन सुरू होताच त्याचा धावत्या ट्रेनमधून उडी मारली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना इतक्या लवकर घडली की रितेशला नेमकं काय करायचं? हे कळलंच नाही. दरम्यान, त्याने चोराला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी त्याचा तोल गेला आणि तो रेल्वे ट्रॅकवर पडला. यामध्ये त्याचा डावा पाय ट्रेनच्या चाकाखाली चिरडला गेला. 

हे ही वाचा: शेतात निघालेल्या विवाहितेला दिवसाढवळ्या उचललं, बळजबरीने थारमध्ये बसवून... नेमकं प्रकरण काय?

उपस्थित रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांनी रितेशला तातडीने मदत केली आणि त्याला उपचारांसाठी उल्हासनगर सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तो गंभीररित्या जखमी झाल्याने, त्याला नंतर परळ येथील केईएम रुग्णालयात रेफर करण्यात आलं. आता तिथे त्याच्यावर सर्जिकल इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालयात रितेशची पत्नी आणि त्याचे आई-वडील उपस्थित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत, कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणाले की, आरोपी कैलाश जाधवने प्रकारच्या फोन चोरीच्या बऱ्याच घटना घडवून आणल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp