पुण्याचं महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव, भाजपमधून 'या' 4 नगरसेविकांची नावे चर्चेत
Pune Mahapalika Mayor post reserved for a woman from the general category : भाजपमधून चार महिला नगरसेविकांची नावे सध्या जोरदार चर्चेत आहेत. त्यामध्ये रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे आणि रोहिणी चिमटे यांचा समावेश आहे. या सर्व नगरसेविकांचा महापालिकेत काम करण्याचा अनुभव आहे. शिवाय पक्षातील स्थान आणि राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांची नावे महापौरपदासाठी पुढे येत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्याचं महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव
भाजपमधून 'या' 4 नगरसेविकांची नावे चर्चेत
Pune Mahapalika Mayor post reserved for a woman from the general category : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्य. दरम्यान, आज (दि.22) सर्व 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. त्यातच पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी जाहीर झालेल्या आरक्षणामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पुण्याचं महापौरपद यंदा सर्वसाधारण (खुला) महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलं आहे.
महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने आता पुणे महापालिकेच्या महापौरपदी कोणती महिला विराजमान होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. पुणे महापालिकेत सध्या भाजपचे संख्याबळ अधिक आहे. पुणेकरांनी भाजपकडे एकहाती सत्ता दिली आहे. त्यामुळे भाजपमधील महिला नगरसेविकांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून संभाव्य नावांवर राजकीय गणितं मांडली जात आहेत.
हेही वाचा : मुंबईचं महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव, भाजपच्या गोटातून 'या' नगरसेविकेचं नाव सर्वात आघाडीवर
पुणे महानगर पालिकेसाठी महापौरपद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव
पुण्याचा महापौर खुल्या प्रवर्गासाचा असणार










