मुंबईत महानगपालिकेच्या आरक्षण सोडतीवरुन राडा, ठाकरे गटाने टाकला बहिष्कार, काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

मुंबई तक

BMC Mayor : मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीत महापौरपद हे सर्वसाधारण महिला गटासाठी जाहीर झाले आहे. ही सोडत जाहीर झाल्यानंतर जोरदार गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले. या सोडतीवर ठाकरे गटाने आक्षेप घेत त्यावर बहिष्कार टाकला आहे. ही सोडत ठरवून करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

Kishori Pednekar
Kishori Pednekar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत महानगपालिकेच्या आरक्षण सोडतीवरुन राडा

point

ठाकरे गटाने टाकला बहिष्कार

BMC Mayor : मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीत महापौरपद हे सर्वसाधारण महिला गटासाठी जाहीर झाले आहे. ही सोडत जाहीर झाल्यानंतर जोरदार गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले. या सोडतीवर शिवसेना UBT ने आक्षेप घेत त्यावर बहिष्कार घातला आहे. ही सोडत ठरवून करण्यात आल्याचा आरोप शिवसेना UBT च्या नेत्या आणि  मुंबईच्या माजी महापौर  किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. तसेच सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लागलेल्या निकालाकडे बघूनच ही सोडत काढण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या.

हे ही वाचा :  वडिलांना ZP चं तिकीट न दिल्याचा राग, लातूरच्या तरुणाने आमदाराच्या कार्यालयाबाहेर केलं मूत्रविसर्जन!

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

मुंबईतील आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर जोरदार गोंधळ झाल्याचे पहायला मिळत आहे. किशोरी पेडणेकर यांनी या सोडतीवर आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, 'सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लागलेल्या निकालाकडे बघून ही सोडत काढण्यात आली आहे. याचा आम्ही धिक्कार करतो. या लोकांनी ओबीसी, अनुसूचीत जाती-जमाती, भटक्या जातींवर मुंबईमध्ये अन्याय केला आहे. अनुसूचित जमातीच्या चिठ्ठ्या का टाकण्यात आल्या नाहीत?'असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच अनुसूचित जमातीचे तीन उमेदवार नसल्याने त्यांच्या चिठ्ठ्या टाकण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. याविषयी पेडणेकर म्हणाल्या की, 'या नियमाविषयी आधी का सांगण्यात आले नाही. याचा अर्थ ही सोडत ठरवून आणि जाणून-बुजून करण्यात आली आहे. 

दरम्यान, शिवसेना UBT ने केलेल्या तक्रारी नोंदवून घेतल्या जातील असं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp