आंबा घाटात भीषण अपघात; ४०० फूट खोल दरीत कोसळली गाडी
रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात गुरुवारी भीषण अपघात झाला. सांगलीवरून गणपतीपुळे येथे निघालेल्या कुटुंबाची गाडी तब्बल ४०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत २ महिन्यांच्या चिमुकल्यासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. घाटातील गायमुखजवळ हा अपघात झाला. रस्त्याचा अंदाज न आल्याने आणि कठडा नसल्यामुळे किया सँल्टोस (KA32-Z0949) गाडी खोल […]
ADVERTISEMENT

रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात गुरुवारी भीषण अपघात झाला. सांगलीवरून गणपतीपुळे येथे निघालेल्या कुटुंबाची गाडी तब्बल ४०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत २ महिन्यांच्या चिमुकल्यासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात जखमी झालेल्या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. घाटातील गायमुखजवळ हा अपघात झाला.
रस्त्याचा अंदाज न आल्याने आणि कठडा नसल्यामुळे किया सँल्टोस (KA32-Z0949) गाडी खोल दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस स्थानकाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्याचप्रमाणे साखरपा व आंबा येथील स्थानिक तरुण मदतीसाठी धावून गेले.