सचिन वाझेची हृदय शस्त्रक्रियेनंतरची महत्त्वाची मागणी एनआयए कोर्टाने फेटाळली
अँटेलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणा अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला (Sachin Vaze) NIA ने आणखी एक धक्का दिला आहे. सचिन वाझेवर नुकतीच बायपास सर्जरी करण्यात आली. त्यामुळे मला तुरुंगात न पाठवता घरात नजरकैदेत ठेवण्यात यावं अशी विनंती सचिन वाझेने कोर्टाकडे केली होती. मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे. सचिन वाझेला छातीत […]
ADVERTISEMENT

अँटेलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणा अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला (Sachin Vaze) NIA ने आणखी एक धक्का दिला आहे. सचिन वाझेवर नुकतीच बायपास सर्जरी करण्यात आली. त्यामुळे मला तुरुंगात न पाठवता घरात नजरकैदेत ठेवण्यात यावं अशी विनंती सचिन वाझेने कोर्टाकडे केली होती. मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे.
सचिन वाझेला छातीत दुखू लागल्याने काही दिवसांपूर्वी जे. जे. रूग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला बायपास सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. ही सर्जरी त्याच्यावर नुकतीच पार पडली. तुरुंगात प्रकृती खालावल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने रूग्णालयात दाखल करण्यात आलेले आणि प्रकृतीसंदर्भात केलेला अर्ज प्रलंबित असतानाच उपचारादरम्यान दगावलेले स्टॅन स्वामी यांच्यासारखी आपली अवस्था होऊ नये असंही सचिन वाझेने म्हटलं होतं.
सचिन वाझेच्या या विनंती अर्जावर विचार करून न्यायलायने 30 ऑगस्टला त्याच्या निवडीच्या रूग्णालयात उपचार घेण्याची आणि शस्त्रक्रिया करण्याची मुभा दिली. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत पुढील तीन महिने आपल्याला घरातच नजरकैदेत ठेवावं असा अर्ज सचिन वाझेने केला होता. मात्र त्याची ही विनंती न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सचिन वाझेला तळोजा येथील तुरुंगाच्या रूग्णालयात शिफ्ट करण्यात यावं असं अर्ज फेटाळत असताना कोर्टाने म्हटलं आहे. त्याने केलेली ही मागणी फेटाळून लावत कोर्टाने त्याला धक्का दिला आहे.