हिंदूंना ज्या भावात गॅस-पेट्रोल मिळतं, त्याच भावात मुस्लिमांना मिळतं -नितीन गडकरी

मुंबई तक

अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गांचं लोकार्पण आणि कोनशिला समारंभ पार पडला. राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी विकासाच्या मुद्दे अधोरेखित केले. गरिबी आणि धर्मातील भेदांवरही गडकरी यांनी यावेळी भाष्य केलं. अहमदनगर जिल्ह्यात 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा झाला. नितीन गडकरी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गांचं लोकार्पण आणि कोनशिला समारंभ पार पडला. राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी विकासाच्या मुद्दे अधोरेखित केले. गरिबी आणि धर्मातील भेदांवरही गडकरी यांनी यावेळी भाष्य केलं.

अहमदनगर जिल्ह्यात 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा झाला. नितीन गडकरी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच खासदार सुजय विखे-पाटील यांना मिश्किल टोला लगावला.

“खासदार विखेंनी सांगितलं की, सगळ्यात जास्त निधी अहमदनगर जिल्ह्याला मिळाला. त्यांनी हे उद्गार काढले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण, मी ज्या-ज्या जिल्ह्यात जातो, त्या-त्या जिल्ह्यातील खासदार हेच म्हणत असतो. ज्या राज्यात जातो, त्या राज्यातील मुख्यमंत्री म्हणतो की आम्हाला जास्त निधी मिळाला, असं म्हणत असतो’, असं म्हणताच व्यासपीठावरील मान्यवरांवर उपस्थितामध्ये हस्या पिकला.

‘खरंतर आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे. हा विकास करण्यासाठी चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाणी, वीज, रस्ते आणि संवाद सुविधा! आपल्या देशात उद्योग आणायचे असतील, तर उद्योग सुरू होण्याआधी उद्योजक विचार करतो की, या चार गोष्टी आहेत की नाही. जर या गोष्टी असेल, तर तिथे उद्योग आणतो. उद्योग आला तर स्वाभाविकपणे भांडवली गुंतवणूक येते आणि भांडवली गुंतवणूक आली, तर रोजगार निर्माण होतो’, असं गडकरी म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp