KGF फेम अभिनेते हरीश राय यांचं निधन, वयाच्या 55 व्या वर्षी अखेरचा श्वास; कॅन्सरशी झुंज अपयशी

मुंबई तक

KGF fame harish rai passes away : KGF फेम अभिनेते हरीश राय यांचं निधन, वयाच्या 55 व्या वर्षी अखेरचा श्वास; कॅन्सरशी झुंज अपयशी

ADVERTISEMENT

KGF fame harish rai passes
KGF fame harish rai passes
social share
google news

बातम्या हायलाइट

point

KGF फेम अभिनेते हरीश राय यांचं निधन

point

वयाच्या 55 व्या वर्षी अखेरचा श्वास; कॅन्सरशी झुंज अपयशी

KGF fame harish rai passes away : कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते हरीश राय यांचे गुरुवारी (दि. 6) निधन झाले. वयाच्या 55 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. हरीश राय गेल्या काही काळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्वतः सोशल मीडियावरून ही दु:खद बातमी दिली आणि हरीश राय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

शिवकुमार यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले, “कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक हरीश राय यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. ते कॅन्सरशी झुंज देत होते आणि त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ‘ओम’, ‘हलायम’, ‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ 2’ सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अप्रतिम अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि देव त्यांच्या परिवाराला व जवळच्या व्यक्तींना या दु:खाचा सामना करण्याची शक्ती देवो.”

हरीश राय यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आणि आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. त्यांनी टीव्ही आणि नाटक क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले होते. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अनेक कलाकारांनी म्हटले की, “हरीश रायसारखे साधे पण महान कलाकार क्वचितच पाहायला मिळतात, ज्यांनी साधेपणा आणि अभिनय दोन्ही एकत्र जापासले.”

हेही वाचा : मोठी बातमी : तहसिलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन, पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई

हे वाचलं का?

    follow whatsapp