टेबल-खुर्ची हटवायला तुम्हाला बुलडोझर लागला? जहांगीरपुरीतील कारवाईवर कोर्टाची स्थगिती कायम

मुंबई तक

नवी दिल्लीतील जहांगीरपुरी येथील हिंसाचारानंतर अवैध बांधकामांवर होत असलेल्या कारवाईवर आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अवैध बांधकामांवरील कारवाईवप स्थगिती कायम ठेवत पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे. याचसोबत न्यायालयाने या प्रकरणात उत्तर दिल्ली नगरपालिका, दिल्ली पोलीस, दिल्ली राज्य सरकार आणि केंद्र सरकार या सर्वांना आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्लीतील जहांगीरपुरी येथील हिंसाचारानंतर अवैध बांधकामांवर होत असलेल्या कारवाईवर आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अवैध बांधकामांवरील कारवाईवप स्थगिती कायम ठेवत पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे. याचसोबत न्यायालयाने या प्रकरणात उत्तर दिल्ली नगरपालिका, दिल्ली पोलीस, दिल्ली राज्य सरकार आणि केंद्र सरकार या सर्वांना आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.

आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्यांना बुधवारी पालिकेने तोडकामाला सुरुवात करण्याआधी कोणती नोटीस दिली होती का? याबाबत आपलं म्हणणं मांडायला सांगितलं आहे. जाणून घ्या आतापर्यंत या प्रकरणात काय-काय घडलंय.?

-) हनुमान जयंतीच्या यात्रेत शनिवारी दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात दोन गटांमध्ये हिंसाचार झाला, ज्यात ९ जणं जखमी झाले.

-) दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करुन २७ जणांना अटक केली असून यात दोन अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp