महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत चिंता नाही-शरद पवार

मुंबई तक

महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत मला कसलीही चिंता नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. याच निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिवसेना आणि आपण कधी सोबत येऊ असं कुणालाही खरं वाटलं नसतं. मात्र आपण हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत मला कसलीही चिंता नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. याच निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिवसेना आणि आपण कधी सोबत येऊ असं कुणालाही खरं वाटलं नसतं. मात्र आपण हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आणि महत्त्वाचं म्हणजे हा प्रयोग लोकांनी स्वीकारला आहे. आपल्याला लोकांचा विश्वास संपादन करता आला ही बाब महत्त्वाची आहे.

आणखी काय म्हणाले शरद पवार?

‘आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं. हा पर्याय दिल्यानंतर अनेकजण म्हणत होते की हे सरकार काही दिवसांमध्ये पडेल. काही आठवड्यांमध्ये पडेल, काहींनी महिन्यांचीही मुदत दिली. मात्र तसं काहीही झालं नाही. लोकांना आपण पर्याय दिला आणि लोकांनी तो स्वीकारला.तिन्ही पक्षांनी योग्य पावलं टाकली आणि आज महाविकास आघाडी सरकार चांगल्या पद्धतीने काम करतं आहे.’ असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर हे किती दिवस टिकाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र आता मला या सरकारच्या भवितव्याविषयी काहीही चिंता वाटत नाही. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सहकाऱ्यांच्या कष्टांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने 22 वर्षे पूर्ण केली-शरद पवार

हे वाचलं का?

    follow whatsapp