Money Laundering प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीची ईडीकडून चौकशी

जॅकलिन पाठोपाठ आता नोरा फतेहीची ईडीकडून चौकशी
Money Laundering प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीची ईडीकडून चौकशी
नोरा फतेहीफोटो-इंडिया टुडे

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही ईडीच्या कार्यालयात पोहचली आहे. तिथे तिची चौकशी सुरू आहे. मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही चौकशी करण्यात येते आहे. याआधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही चौकशी करण्यात आली होती. त्याच प्रकरणात आता नोरा फतेहीलाही हजर राहण्यासाठीचं समन्स ईडीने बजावलं होतं. त्यामुळे नोरा फतेही ईडी कार्यालयात पोहचली आहे. ईडी कार्यालयात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तिला द्यावी लागणार आहेत.

नोरा फतेही
नोरा फतेहीफोटो-इंडिया टुडे

दिल्लीच्या तिहार कारागृहातून २०० कोटींची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी नोरा फतेहीची चौकशी करण्यात येते आहे. या प्रकरणी पुन्हा एकदा जॅकलिन फर्नांडिस उद्या ईडी कार्यालयात येऊ शकते.

नोरा फतेही
नोरा फतेहीफोटो-आज तक

काय आहे प्रकरण?

खंडणीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी हे प्रकरण निगडीत आहे असं समजतं आहे. तिहार जेलमधून 23 ऑगस्टला आत्तापर्यंत सर्वात मोठी खंडणी 200 कोटी वसूल करणाऱ्या आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि अॅक्ट्रेस लीना पॉलच्या चेन्नई येथील बंगल्यावर ईडीने छापा मारला होता. ईडीने ईस्ट कोस्ट रोडवर असलेल्या सुकेशच्या बंगल्यावर जो छापा मारला त्या बंगल्याची किंमत कोट्यवधी रूपये आहे. छापा मारल्यानंतर ईडीने मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि पंधरा आलिशान कार जप्त केल्या.

नोरा फतेही
सिल्वर ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा जलवा!

सुकेशने तिहार जेलमधून एका मोठ्या व्यावसायिकाच्या पत्नीकडून 200 कोटींची खंडणी वसूल केली. यामध्ये RBL बँकेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत तिहार प्रशासनाच्या काही लोकांना अटक करण्यात आली. सुकेशची निकटवर्तीय असलेल्या लीना पॉलचीही ईडीने चौकशी केली. सुकेशला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. सुकेश सध्या EOW च्या कोठडीत आहे. एवढंच नाही तर सुकेशला AIDMK चिन्हाच्या प्रकरणातही अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in