RSS ची तुलना तालिबानशी केल्याप्रकरणी जावेद अख्तर यांच्या विरोधात FIR
One more FIR registered against lyricist Javed Akhtar for comparing RSS with Taliban

RSS ची तुलना तालिबानशी केल्याप्रकरणी जावेद अख्तर यांच्या विरोधात FIR

जावेद अख्तर यांच्या अडचणींमध्ये वाढ

RSS ची तुलना तालिबानशी केल्या प्रकरणी ज्येष्ठ गीतकार आणि कथा लेखक जावेद अख्तर यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. स्थानिक वकील संतोष दुबे यांनी जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही कारवाई मुलुंड येथील पोलिसांनी केली आहे.

India Today

काय म्हणाले होते जावेद अख्तर?

'भारतातील मुस्लिम तरुणांना चांगलं काम, चांगलं शिक्षण आणि स्वतःच्या मुलांसाठी चांगली शाळा हवीये. पण, दुसरीकडे असेही लोक आहेत, जे रुढीवादावर विश्वास ठेवतात. महिला व पुरुष यांना वेगवेगळ्या पद्धतीने वागवलं जातं. अशा जुन्या पद्धतीवर विश्वास ठेवणारेही आहेत', असं मत त्यांनी मांडलं. बुरसटलेल्या विचारांच्या लोकांची संख्या खूप कमी आहे. त्यांना जे म्हणायचं म्हणत राहू द्या. ते त्यात यशस्वी होणार नाहीत. जगभरातील हिंदूत्ववाद्यांनाही असंच हवं आहे. तालिबान, इस्लामिका राष्ट्रांना जे हवंय, तसंच यांना हिंदू राष्ट्र हवं आहे. हे एक लोक एकाच मानसिकतेचे आहेत', असंही जावेद अख्तर म्हणाले.

One more FIR registered against lyricist Javed Akhtar for comparing RSS with Taliban
'जावेद अख्तर, आम्ही म्हणतोय ते बरोबर आहे ना?'; RSS वरील टीकेला शिवसेनेचं उत्तर

'तालिबान रानटी वृत्तीची आहे, यात कसलीही शंका नाही. पण, आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांना पाठिंबा देणारे, त्यांचं समर्थन करणारेही तालिबानचं समर्थन करणाऱ्यांसारखेच आहेत. भारत समाजवादी (सेक्युलर) देश आहे. त्यामुळे तालिबानचा विचार कोणत्याही भारतीयाला पटणार नाही. या देशातील जास्त लोक हे सभ्य आणि सहनशील आहेत', असं मत जावेद अख्तर यांनी मांडलं होतं.

यानंतर आरएसएसशी संबंधित काही जणांनी जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. आता यातल्या तक्रारीवरून जावेद अख्तर यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता जावेद अख्तर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Related Stories

No stories found.