अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीचा वाद विकोपाला! अंदाधुंद गोळीबार, घटनेचा व्हिडीओ आला समोर
-मिथिलेश गुप्ता, कल्याण ठाण्याजवळ असलेल्या अंबरनाथमध्ये भरदिवसा अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडलीये. घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, बैलगाडा शर्यतीच्या वादातून दोन गट समोरासमोर आल्याची माहितीय आहे. गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार सीसीटीव्ही आणि अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केलाय. ठाणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यती सुरू झाल्या असून, यातून वाद उफाळल्यानं अंबरनाथमध्ये तणाव निर्माण झाला होता. बैलगाडा शर्यतीवरून अंबरनाथमध्ये […]
ADVERTISEMENT

-मिथिलेश गुप्ता, कल्याण
ठाण्याजवळ असलेल्या अंबरनाथमध्ये भरदिवसा अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडलीये. घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, बैलगाडा शर्यतीच्या वादातून दोन गट समोरासमोर आल्याची माहितीय आहे. गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार सीसीटीव्ही आणि अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केलाय.
ठाणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यती सुरू झाल्या असून, यातून वाद उफाळल्यानं अंबरनाथमध्ये तणाव निर्माण झाला होता. बैलगाडा शर्यतीवरून अंबरनाथमध्ये दोन गटात वाद झाला. अंबरनाथमधील एका प्रसिद्ध हॉटेल समोर बैलगाडा शर्यतीच्या वादातून दोन गटात बाचाबाची झाली. वाद शिगेला गेल्यानंतर हॉटेलच्या परिसरातच अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.
सुदैवानं या गोळीबारात कुणाचाही मृत्यू झाल्याची वा जखमी झाल्याची घटना घडली नाही.