महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? जाणून घ्या परिस्थिती
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढ होणारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या राज्य सरकारला चिंतेत पाडत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह विदर्भातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये निर्बंध आणि लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. २०२० मध्ये संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला. महाराष्ट्रातही आजच्या दिवशी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. वर्षभराच्या काळात देशभरासह राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला. […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढ होणारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या राज्य सरकारला चिंतेत पाडत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह विदर्भातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये निर्बंध आणि लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. २०२० मध्ये संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला. महाराष्ट्रातही आजच्या दिवशी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. वर्षभराच्या काळात देशभरासह राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला. अनेकांनी या विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढताना आपले प्राणही गमावले.
नवीन वर्षात कोरोनाची लस बाजारात आल्यानंतर लसीकरणाला सुरुवातही झाली. परिस्थिती नियंत्रणात येतेय असं वाटत असताना राज्यात गेल्या महिन्यांपासून रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होते आहे. राज्य सरकारने अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. आज आपण राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनची काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊयात..
१) …तर मुंबईत अंशतः लॉकडाऊन – पालकमंत्री अस्लम शेख
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुंबईत अंशतः लॉकडाउन जाहीर करण्याच्या पर्यायावर चर्चा झाली आहे. गेल्या वर्षात सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत रुग्णवाढीचा वेग हा प्रचंड होता. नवीन वर्षात मार्च महिन्यामध्येच ती परिस्थिती ओढावल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सुरुवातीला सरकार, रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आर्थिक दंड, लग्न आणि इतर सोहळ्यांमध्ये गर्दी केल्यास कारवाई असे पर्याय आजमावून पाहणार आहे. परंतू तरीही परिस्थिती नियंत्रणात राहिली नाही तर शहरात अंशतः लॉकडाउन लावलं जाईल अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे.