परमबीर सिंग देश सोडून पळून गेलेत; जयंत पाटील यांची धक्कादायक माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करत राज्यात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आहेत तरी कुठे अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या चांदिवाल आयोगाने दोनदा समन्स बजावूनही परमबीर सिंह हजर झालेले नाहीत. त्यामुळे परमबीर सिंह यांनी पलायन केलं असल्याच्या चर्चेनंही जोर धरला आहे. त्यातच आता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सिंह परदेशात फरार झाले असल्याचं म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही यात्रा आज नाशिक जिल्हयात दाखल झाली. या यात्रेदरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी परमबीर सिंह देश सोडून पळून गेले असल्याचं म्हटलं.

“छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबण्याचं काम भाजप सरकारने केलं. परंतु कोर्टानं त्या आरोपातून त्यांना निर्दोष मुक्त केलं. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे. अनिल देशमुखांवर आरोप करणारे परमवीर सिंग देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या आरोपांवर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा?”, असा सवाल जंयत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“लोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्याचे काम होतंय. सरकार चांगले काम करत असताना नाहक त्रास दिला जातोय,हे लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

भुजबळांच्या नेतृत्वाचं कौतुक…

ADVERTISEMENT

“ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम झालं आहे. भुजबळ यांच्या कल्पकतेमुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश आलं. भुजबळ यांच्यासारखं नेतृत्व जपण्याचं काम आपण केलं आहे”, असं म्हणत जयंत पाटील यांनी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं कौतुक केलं.

“पश्चिमेकडे वाहून जाणारं पाणी उत्तरेकडे वळवण्याचा पहिला प्रयत्न आम्ही मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून केला. हा प्रयोग यशस्वी झाला, तो छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यानं. त्यामुळे भुजबळ यांना आधुनिक युगाचा भगीरथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही’, असंही जयंत पाटील म्हणाले.

‘मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून पाऊस जरा जास्तच पडतोय. जायकवाडी धरण भरुन वाहत आहे. मात्र इथल्या शेतकऱ्यांना जास्त पाऊस पडून उपयोग नाही. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम सरकार करणार आहे’, असंही जयंत पाटील म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT