परमबीर सिंग यांनी कसाबचा फोन ISI ला विकला असावा! निवृत्त एसीपींचा अत्यंत गंभीर आरोप
मुंबई पोलिसात असिस्टंट कमिश्नर ऑफ पोलीस म्हणजेच एसीपी राहिलेल्या शमशेर खान पठाण यांनी आज परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप मुंबईत घडलेल्या 26/11 प्रकरणाशी संबंधित आहेत. त्यावेळी परमबीर सिंग हे ATS चे DIG होते. परमबीर सिंग यांनी दहशतावादी कसाबचा फोन हा आयएसआयला विकला असावा असा अत्यंत गंभीर आरोप निवृत्त एसीपी शमशेर खान […]
ADVERTISEMENT

मुंबई पोलिसात असिस्टंट कमिश्नर ऑफ पोलीस म्हणजेच एसीपी राहिलेल्या शमशेर खान पठाण यांनी आज परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप मुंबईत घडलेल्या 26/11 प्रकरणाशी संबंधित आहेत. त्यावेळी परमबीर सिंग हे ATS चे DIG होते. परमबीर सिंग यांनी दहशतावादी कसाबचा फोन हा आयएसआयला विकला असावा असा अत्यंत गंभीर आरोप निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी केला आहे.
परमबीर सिंग चौकशीसाठी हजर व्हा! चांदीवाल आयोगाने दिले आदेश
काय म्हटलं आहे शमशेर खान पठाण यांनी?
26/11 चा हल्ला ज्यावेळी मुंबईवर झाला. त्यावेळी परमबीर सिंग हे त्यावेळी एटीएसचे प्रमुख होते. पण त्यांना त्यावेळी आपल्या देशाऐवजी शत्रू राष्ट्राला पाठिंबा देणं उचित वाटलं असावं. त्यांची त्यावेळची कृती हेच सांगते. अजमल आमिर कसाब हा दहशतवादी जिवंत पकडला गेला होता. त्यावेळी त्याचा मोबाईल फोन हा परमबीर सिंग यांनी ताब्यात घेतला होता. त्या फोनचं पुढे काय झालं ते समजू शकलं नाही कारण तो फोन परमबीर सिंग यांनी ISI ला विकला असावा. कसाबचा खटला चालला त्यावेळी किंवा त्या दरम्यान कधीही या फोनबाबत कुठलंही स्पष्टीकरण समोर आलं नाही.