Social Media वर पेगासस फोन टॅपिंग कनेक्शनची चर्चा, मोदींच्या मंत्र्यांचे, खासदारांचे फोन टॅप?

मुंबई तक

रविवारी संध्याकाळी वॉशिंग्टन पोस्ट आणि लंडन गार्डियन या दोन वृत्तपत्रांमध्ये भारतातल्या पेगासस फोन टॅपिंगशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर येऊ शकते अशी चर्चा आहे. तसा अहवालच ही दोन वृत्तपत्रं प्रकाशित करण्याची चिन्हं आहेत. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी काय म्हटलं आहे? ‘अशा जोरदार अफवा आहेत की आज संध्याकाळी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

रविवारी संध्याकाळी वॉशिंग्टन पोस्ट आणि लंडन गार्डियन या दोन वृत्तपत्रांमध्ये भारतातल्या पेगासस फोन टॅपिंगशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर येऊ शकते अशी चर्चा आहे. तसा अहवालच ही दोन वृत्तपत्रं प्रकाशित करण्याची चिन्हं आहेत. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी काय म्हटलं आहे?

‘अशा जोरदार अफवा आहेत की आज संध्याकाळी वॉशिंग्टन पोस्ट आणि लंडन गार्डियन एक अहवाल प्रकाशित करणार आहेत. या अहवालात मोदी सरकारमधले मंत्री, आरएसएसचे नेते, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप करण्यासाठी इस्रायली फर्म असलेल्या पेगासासची मदत घेण्यात आली आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रॉयन यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. फोन टॅपिंगच्या यादीत विरोधी पक्षाच्या नेत्यांचीही नावं आहेत. याचाच अर्थ विरोधी पक्षातल्या लोकांचेही फोन टॅप करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp