पेट्रोल-डिझेलचा पुन्हा भडका! मुंबई, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरात काय आहेत इंधनाचे दर?
कोरोना आणि बिघडलेल्या आर्थिक गणितामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल दरवाढीचे आघात सोसावे लागत आहेत. देशात पुन्हा एकदा इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली असून, राज्यात नांदेड, आणि परभणीत पेट्रोल सर्वाधिक महागड्या दराने घ्यावं लागत आहे. तर मुंबई डिझेलचे दर प्रति लीटर 101 रुपयांवर पोहोचले आहेत. तेल वितरक कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. […]
ADVERTISEMENT

कोरोना आणि बिघडलेल्या आर्थिक गणितामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल दरवाढीचे आघात सोसावे लागत आहेत. देशात पुन्हा एकदा इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली असून, राज्यात नांदेड, आणि परभणीत पेट्रोल सर्वाधिक महागड्या दराने घ्यावं लागत आहे. तर मुंबई डिझेलचे दर प्रति लीटर 101 रुपयांवर पोहोचले आहेत.
तेल वितरक कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात लिटरमागे 30 पैसे, तर डिझेलच्या दरात लिटरमागे 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल 104.44 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. तर डिझेल लिटरमागे 93.17 रुपयांवर गेलं आहे.
मुंबईतही पेट्रोलचे दर नव्या उच्चाकांवर पोहोचले आहेत. मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 110.41 पैसे, तर डिझेलसाठी 101.03 रुपये मोजावे लागणार आहेत. राज्यात पेट्रोलचे सर्वाधिक महाग दर परभणी आणि नांदेड जिल्ह्यात आहे. परभणीत पेट्रोल प्रतिलिटर 112.53 रुपयांवर पोहोचले आहे, तर नांदेडमध्येही एक लिटर पेट्रोलसाठी 112.31 रुपये मोजावे लागत आहेत.
दिल्ली में आज पेट्रोल और डीजल के दाम क्रमश: 0.30 रुपये (104.44 रुपये प्रति लीटर) और 0.35 रुपये (93.17 रुपये प्रति लीटर) बढ़ गए।
मुंबई में आज पेट्रोल की कीमत 110.41 रुपये प्रति लीटर (0.29 रुपये ऊपर) और डीजल की कीमत 101.03 रुपये प्रति लीटर (0.37 रुपये ऊपर) है।
— ANI_HindiNews (@AHindinews) October 11, 2021
Petrol Diesel Under GST : शंभरीवर गेलेलं पेट्रोल 70 रूपयांत कसं मिळणार? | समजून घ्या
राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर (प्रतिलिटर रुपयांमध्ये)
पुणे : पेट्रोल – 110.51 डिझेल – 99.57
नागूपर : पेट्रोल – 110.14 डिझेल – 99.25
नाशिक : पेट्रोल – 110.46 डिझेल -99.53
औरंगाबाद : पेट्रोल – 110.65 डिझेल – 99.71
ठाणे : पेट्रोल – 109.87 डिझेल – 98.94
जळगाव : पेट्रोल – 111.22 डिझेल -100.29
कोल्हापूर : पेट्रोल – 110.09 डिझेल -99.19
समजून घ्या : पेट्रोल 100 रूपयांना का मिळतंय?
तुमच्या शहरातील दर जाणून घेण्यासाठी…
एक मेसेज करून आपण आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी इंडियन ऑईलच्या एसएमएस सेवेचा वापर करता येईल. आपल्या मोबाईलवरून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवा लागणार आहे. RSP स्पेस देऊन पेट्रोल पंप डिलरचा कोड टाका आणि मेसेज सेंड करा. RSP कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर आपल्या मिळेल.