PMC Bank : पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे मिळणार; USFB बँकेत होणार विलिनीकरण
आर्थिक संकटात सापडलेल्या पीएमसी अर्थात पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को ऑपरेटिव बॅंकेतील ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीएमसी बँकेचं यूनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलिनीकरण केलं जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ड्राफ्ट स्कीम जाहीर केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या ड्राफ्ट स्कीमप्रमाणे पीएमसी बँकेची संपत्ती आणि दायित्व पूर्णपणे यूनिटी स्मॉल फायनान्स बँकेचं असणार […]
ADVERTISEMENT

आर्थिक संकटात सापडलेल्या पीएमसी अर्थात पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को ऑपरेटिव बॅंकेतील ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीएमसी बँकेचं यूनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलिनीकरण केलं जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ड्राफ्ट स्कीम जाहीर केली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या ड्राफ्ट स्कीमप्रमाणे पीएमसी बँकेची संपत्ती आणि दायित्व पूर्णपणे यूनिटी स्मॉल फायनान्स बँकेचं असणार आहे. यात पीएमसी बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहावेत म्हणून या अटींचा समावेश विलिनीकरण करारात करण्यात आलेला आहे.
‘रेग्युलेटरी नियमांप्रमाणे स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्यासाठी 200 कोटी रुपये असणे गरजेचं आहे. मात्र, युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचं भांडवल 1,100 कोटी रुपये इतकं आहे, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटलं आहे.
ड्राफ्ट स्कीमप्रमाणे 1900 कोटी रुपयांचं इक्विटी वारंट (समभाग अधिपत्र) असून, ज्याचा वापर 8 वर्षांच्या कालावधीत कधीही करता येऊ शकणार आहे. हे इक्विटी वारंट (समभाग अधिपत्र) 1 नोव्हेंबर 2021 रोजी यूनिटी स्मॉल फायनान्स बँकेसाठी जारी करण्यात आलेलं आहे.