पिंपरी-चिंचवड : पिस्तुल दाखवून खंडणी मागण्याचा प्रयत्न, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

सराईत गुन्हेगार देवा जामदारचा परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न
पिंपरी-चिंचवड : पिस्तुल दाखवून खंडणी मागण्याचा प्रयत्न, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

- समीर शेख, पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिस्तुलाच्या धाकावर खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध तळेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगार देवा जामदारचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात सध्या या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दक्षता कमिटीवर काम करणाऱ्या वंदना तरस यांच्या घरात घुसून देवा जामदारने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत १५ हजारांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुमच्या जिवाचं काहीतरी बरंवाईट होईल अश धमकीही आरोपीने दिली. वंदना यांनी प्रसंगावधान राखुन मैत्रिणीला फोन लावते असं सांगत पोलिसांना फोन लावला, परंतू पोलिसांना फोन न लागल्यामुळे वंदना यांनी आरोपीसमोर रुद्रावतार धारण करत पैसे देणार नाही असं ठणकावून सांगितलं. वंदना यांचा हा रुद्रावतार पाहून आरोपी देवाने आपल्या साथीदारांसह पळ काढला.

पिंपरी-चिंचवड : पिस्तुल दाखवून खंडणी मागण्याचा प्रयत्न, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
डॉन बनण्याचं स्वप्न भंगलं, दरोडा टाकणाऱ्या दोन सुशिक्षित तरुणांना अटक

या घटनेनंतर साईनगर परिसरात असलेल्या एका किराणा दुकानात जाऊन देवाने पुन्हा एकदा पिस्तुलाचा धाक दाखवत शिवीगाळ करत पैश्यांची मागणी करायला सुरुवात केली. परंतू इथेही आपली डाळ शिजत नाही हे लक्षात येताच देवाने घटनास्थळावरुन पळ काढला. काही वेळानंतर वंदना तरस यांना याबद्दलची माहिती कळताच त्यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार करत आरोपीवर गुन्हा दाखल करायला भाग पाडलं.

पिंपरी-चिंचवड : पिस्तुल दाखवून खंडणी मागण्याचा प्रयत्न, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
चोरीच्या आरोपाखाली केली होती अटक, एकाच दिवसात आरोपी पोलिसांच्या ताब्यातून झाला पसार

दुसरीकडे वंदना तरस यांना धमकावल्याप्रकरणी देहु रोड पोलीस ठाण्यात मात्र तक्रार दाखल झाली नाही. देहु रोड पोलिसांनी वंदना यांना आधी अर्ज करा, नंतर आम्ही चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेऊ असं सांगितलं. यानंतर वंदना यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला देवाच्या कारनाम्याचा प्रताप दाखवल्यानंतर त्यांनी देहु रोड पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात आरोपींवर पोलिसांचा काही वचक उरला आहे की नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in