संजय राऊतांसाठी प्रवीण राऊत विमानांची तिकिटं, हॉटेल्स बुक करायचे; पत्नीला 55 लाखही पाठवले-ED
संजय राऊतांसाठी प्रवीण राऊत विमानांची तिकिटं आणि हॉटेल्स बुक करायचे, पत्नीला 55 लाखही पाठवले-ED शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी लेटरबॉम्ब टाकून ईडी या तपासयंत्रणेचा भाजपकडून कसा गैरवापर होतो आहे ते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलं आहे. अशातच ईडी हे पत्रा चाळ येथील 1034 कोटींचा घोटाळा प्रकरण तपासत आहे. ईडीने आता आपल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं […]
ADVERTISEMENT

संजय राऊतांसाठी प्रवीण राऊत विमानांची तिकिटं आणि हॉटेल्स बुक करायचे, पत्नीला 55 लाखही पाठवले-ED
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी लेटरबॉम्ब टाकून ईडी या तपासयंत्रणेचा भाजपकडून कसा गैरवापर होतो आहे ते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलं आहे. अशातच ईडी हे पत्रा चाळ येथील 1034 कोटींचा घोटाळा प्रकरण तपासत आहे. ईडीने आता आपल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्यासाठी विमानांची तिकिटं बुक करत, हॉटेल्स बुक करत आणि प्रवीण राऊत यांच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नीला 55 लाख रूपये पाठवले होते. त्यामुळे आता या सगळ्यावर संजय राऊत काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संजय राऊत यांच्यामागे ED हात धुऊन का लागली आहे? पत्रा चाळ प्रकरण काय आहे?
काय म्हटलं आहे ईडीने?