महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांना केलं काळजी घेण्याचं आवाहन

मुंबई तक

महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्राजक्त तनपुरे, वर्षा गायकवाड यांच्या पाठोपाठ आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोना झाला आहे. बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. काय म्हटलं आहे बाळासाहेब थोरात यांनी? माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्राजक्त तनपुरे, वर्षा गायकवाड यांच्या पाठोपाठ आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोना झाला आहे. बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे.

काय म्हटलं आहे बाळासाहेब थोरात यांनी?

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.

आजच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असल्याचं त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात होते त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असंही आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे अधिवेशनातही हजर होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp