पेट्रोलचे दर वाढल्याने ‘या’ देशात प्रचंड हिंसा, राष्ट्रपती निवासच जाळलं!
अल्माटी (कझाकिस्तान): कझाकिस्तानमध्ये तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती निवासासह अनेक सरकारी कार्यालये आणि इतर राजकीय नेत्यांच्या घरांना आगी लावल्या आहेत. आंदोलकांनी पळून जाण्यापूर्वी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार देखील केल्याचे सांगण्यात येत आहे. कझाकिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आठ पोलीस अधिकारी आणि नॅशनल गार्डचे काही सदस्य ठार झाले तर 300 हून अधिक […]
ADVERTISEMENT

अल्माटी (कझाकिस्तान): कझाकिस्तानमध्ये तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती निवासासह अनेक सरकारी कार्यालये आणि इतर राजकीय नेत्यांच्या घरांना आगी लावल्या आहेत. आंदोलकांनी पळून जाण्यापूर्वी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार देखील केल्याचे सांगण्यात येत आहे.
कझाकिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आठ पोलीस अधिकारी आणि नॅशनल गार्डचे काही सदस्य ठार झाले तर 300 हून अधिक लोक जखमी झाले आहे. यावेळी नागरिकांच्या जीवितहानीची कोणतीही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
आणीबाणीचाही काही परिणाम झाला नाही
राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट टोकायव यांनी आंदोलकांना अनेक वेळा शांततेचे आवाहन केले होते. त्याचा परिणाम न झाल्याने अनेक कठोर पावलेही उचलण्यात आली होती. त्यांनी दोन आठवड्यांची आणीबाणी देखील जाहीर केली होती.