Ukraine-Russia war : युद्धाला तोंड फुटलं! युक्रेनवर लष्करी कारवाईची पुतिन यांची घोषणा
Ukraine-Russia war युक्रेन आणि रशिया यांच्यातला संघर्ष टीपेला पोहचला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनला इशारा दिला आहे की शस्त्र खाली टाका अन्यथा आम्ही बघून घेऊ. एवढंच नाही तर युक्रेनच्या विरोधात सैन्यही त्यांनी उतरवलं आहे. रशियाने युक्रेनविरोधात लष्करी कारवाई करत असल्याची घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी याची घोषणा केली असल्याचे वृत्त […]
ADVERTISEMENT

Ukraine-Russia war युक्रेन आणि रशिया यांच्यातला संघर्ष टीपेला पोहचला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनला इशारा दिला आहे की शस्त्र खाली टाका अन्यथा आम्ही बघून घेऊ. एवढंच नाही तर युक्रेनच्या विरोधात सैन्यही त्यांनी उतरवलं आहे.
रशियाने युक्रेनविरोधात लष्करी कारवाई करत असल्याची घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी याची घोषणा केली असल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिले आहे. रशियाने डोन्बास प्रांतात लष्करी कारवाई सुरू केली असल्याचे वृत्त आहे. रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची काही खैर नाही, असा इशारा देखील रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. एएपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत.
रशिया-युक्रेन संघर्ष : “…तर ४४ मिलियन पुरूष, महिला अन् मुलाचं लक्ष्य युद्ध लढणंच असेल”
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला इशारा देताना शरणागती पत्करण्यास सांगितले आहे. युक्रेनवर रशिया करत असलेल्या कारवाई कोणत्याही देशाने हस्तक्षेप त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असाही इशारा पुतीन यांनी दिला. युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू आले असल्याचे वृत्त ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.










