संजीव पलांडेंनी कधीही पैसे मागितले नाहीत; सचिन वाझेची आयोगासमोर माहिती
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या 100 कोटी वसुली प्रकरणाची राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चांदीवाल आयोगाकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांचे तत्कालीन खासगी सचिव संजीव पलांडे यांच्यावरही आरोप झालेले आहेत. दरम्यान, आयोगासमोर झालेल्या सुनावणी वेळी संजीव पलांडे यांनी कधीही पैसे मागितले नाही, असा खुलासा सचिन वाझेने केला आहे. माजी गृहमंत्री […]
ADVERTISEMENT

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या 100 कोटी वसुली प्रकरणाची राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चांदीवाल आयोगाकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांचे तत्कालीन खासगी सचिव संजीव पलांडे यांच्यावरही आरोप झालेले आहेत. दरम्यान, आयोगासमोर झालेल्या सुनावणी वेळी संजीव पलांडे यांनी कधीही पैसे मागितले नाही, असा खुलासा सचिन वाझेने केला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्त न्यायमूर्ती के.यू. चांदीवाल यांचा एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाकडून प्रकरणाची चौकशी सुरू असून, आयोगाला सचिन वाझे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
सचिन वाझे यांनी सक्तवसुली संचलनायाकडे शपथेवर आरोप केला होता की, अनिल देशमुख यांनी त्यांचे तत्कालीन खासगी सचिव संजीव पलांडे यांच्या माध्यमातून 20 कोटी रुपये स्वीकारले होते. मात्र, चांदीवाल आयोगासमोर बोलताना मात्र, त्यांनी वेगळीच माहिती दिली आहे.
संजीव पलांडे यांच्यावतीने वकील शेखर जगताप यांनी आयोगासमोर सचिन वाझे यांना पैशासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर वाझेने नकारार्थी उत्तर दिलं. शेखर जगताप वाझेला म्हणाले की, “संजीव पलांडे यांनी कोणत्याही कारणासाठी कधी तुमच्याकडे पैशाची मागणी केली होती का?” त्यावर विटनेस बॉक्समध्ये उभ्या असलेल्या सचिन वाझेने ‘नाही’, असं उत्तर दिलं.