Salman Khan: ‘मला शिव्या दिल्या, मारलं…’ Ex गर्लफ्रेंडचे गंभीर आरोप!
Bollywood: बॉलिवूडचा दबंग, भाईजान, चुलबुल पांडे या नावांनी ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सलमान खानची सर्वाधिक क्रेझ ही महिलांमध्ये आहे. सलमान खान नेहमीच त्याच्या पर्सनल लाईफ आणि लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो. त्याचे 90’s चे किस्से हे सर्वांनाच माहित आहेत. अशाच, एका पूर्वीच्या लव्ह अफेअरमुळे आता सलमान वादाच्या भोवऱ्यात […]
ADVERTISEMENT

Bollywood: बॉलिवूडचा दबंग, भाईजान, चुलबुल पांडे या नावांनी ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सलमान खानची सर्वाधिक क्रेझ ही महिलांमध्ये आहे. सलमान खान नेहमीच त्याच्या पर्सनल लाईफ आणि लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो. त्याचे 90’s चे किस्से हे सर्वांनाच माहित आहेत. अशाच, एका पूर्वीच्या लव्ह अफेअरमुळे आता सलमान वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे सलमानच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाईट! युरोपीयन कमिशनने दिलेल्या तरंगत्या दवाखान्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष
सोमी अली कोण?
बॉलिवूडमध्ये जेव्हा-जेव्हा सोमी अलीबाबत चर्चा होते त्यावेळी सलमान खानची चर्चा ही होतेच होते. जेव्हा सलमान खानच्या गर्लफ्रेंड्सच्या उल्लेख होतो तेव्हा सोमी अलीचे नाव नक्कीच येते. सोमी अली ही मूळची पाकिस्तानची रहिवासी आहे. सोमी अलीला बॉलिवूडचे खूप आकर्षण होते. त्यामुळे ती मुंबईला वयाच्या 16व्या वर्षीच आली होती. त्यावेळी तिची ओळख ही सलमानसोबत झाली होती. भारतात तिने 6 वर्ष चित्रपटात काम केलं. काही दिवसांनी त्यांच्या ब्रेकअपची चर्चा होऊ लागली.