Sameer Wankhede : UPSC मध्ये जात प्रमाणपत्राची पडताळणी नेमकी कशी होते? समजून घ्या
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी SC असल्याचे बनावट जात प्रमाणपत्र बनवून सरकारी नोकरी मिळवली आहे. असा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. हे प्रकरण लवकरच छाननी समितीकडे जाईल आणि सत्य देशासमोर येईल, असेही नवाब मलिक म्हणाले आहेत. पण UPSC मध्ये खोटं प्रमाणपत्रं दाखवणं खरंच शक्य आहे का? UPSC सारख्या परीक्षांमधून […]
ADVERTISEMENT

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी SC असल्याचे बनावट जात प्रमाणपत्र बनवून सरकारी नोकरी मिळवली आहे. असा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. हे प्रकरण लवकरच छाननी समितीकडे जाईल आणि सत्य देशासमोर येईल, असेही नवाब मलिक म्हणाले आहेत. पण UPSC मध्ये खोटं प्रमाणपत्रं दाखवणं खरंच शक्य आहे का? UPSC सारख्या परीक्षांमधून उत्तीर्ण झालेल्यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी होत नाही का? होते, तर कशी होते? याच गोष्टी समजून घेऊयात.
SC म्हणजेच अनुसूचित जाती, ST म्हणजेच अनूसुचित जमाती आणि OBC म्हणजेच इतर मागासवर्ग, दिव्यांग यांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी एक ठरवून दिलेली प्रक्रिया असते. शिवाय केंद्र सरकारचे आदेश, कोर्टाच्या आडर्ससुद्धा आरक्षणाचा लाभ उचलणाऱ्या लाभार्थ्यांच्या दाव्याची पडताळणी करताना लक्षात घेतले जातात.
अर्थात आपल्याकडे नियमांच्या चौकटीबाहेर जाणारे, पळवाटा शोधणारे हे तरीही असतातच. वेगवेगळ्या वर्गासाठी आरक्षण सुरू झाल्यापासून अनेकदा असं दिसून आलंय की उमेदवार जातीचा खोटा दाखला पुढे करतात. अनेकदा ही प्रकरणं कोर्टातही गेली आहेत. SC, ST, OBC मध्ये जातीचा दाखला इश्यू करण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया असते, त्यासाठी नियमावलीही घालून देण्यात आली आहे.
सिव्हील सर्विसेसमधील अधिकाऱ्यांच्या जातीच्या दाखल्याचं वेरिफिकेशन करतानाही अनेक टप्पे असतात, अगदी त्यांची बढती आणि बदली होतानाही वेरिफ्केशन होतं. महाराष्ट्रातल्याच एका सिव्हिल सर्वंटने इंडिया टूडेला दिलेल्या माहितीनुसार, ”जर एवढी वर्षे समीर वानखेडेंनी धर्म लपवला असेल तर मग खरी समस्या ही महाराष्ट्राच्या प्रशासकीय कारभारातलीच असेल जर त्यांनी नियमांकडे दुर्लक्ष केलं असेल तर”