धक्कादायक ! वाळूचा टिप्पर नेण्यास विरोध करणाऱ्या युवकाला पाजलं विषारी औषध, बुलढाण्यातील घटना
घरासमोरुन वाळूचा टिप्पर घेऊन जाण्यास विरोध करणाऱ्या युवकाला बुलढाण्यात तिघांनी विषारी औषध पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव-जामोद तालुक्यातील गोळेगाव खुर्द येथे ही घटना घडली असून पोलिसांनी या घटनेत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी पांडे यांनी या घटनेविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ११ जानेवारीला शिवाजी पांडे यांच्या भावाच्या घरासमोरुन वाळूचे टिप्पर […]
ADVERTISEMENT

घरासमोरुन वाळूचा टिप्पर घेऊन जाण्यास विरोध करणाऱ्या युवकाला बुलढाण्यात तिघांनी विषारी औषध पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव-जामोद तालुक्यातील गोळेगाव खुर्द येथे ही घटना घडली असून पोलिसांनी या घटनेत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिवाजी पांडे यांनी या घटनेविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ११ जानेवारीला शिवाजी पांडे यांच्या भावाच्या घरासमोरुन वाळूचे टिप्पर जात असताना, त्यांच्या भावाने या मार्गाने जाऊ नका…धुळीमुळे कुटुंबाला त्रास होतो असं सांगितलं. यानंतर आरोपींनी शिवाजी पांडे यांचा भाऊ सुरज पांडे यांना शिवीगाळ करत भांडायला सुरुवात केली.
यानंतर दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रतन नाईकने सुरज पांडे हात धरले तर इतर दोन आरोपींनी त्याचे पाय धरत त्याला विषारी औषध पाजलं. यानंतर जळगाव पोलिसांत या घटनेबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून गंभीर अवस्थेत जखमी असलेल्या सुरज पांडेवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.
पिंपरी-चिंचवड : पिस्तुल दाखवून खंडणी मागण्याचा प्रयत्न, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल