Schools Reopen : महाराष्ट्रातील शाळा 17 ऑगस्टपासून उघडणार, सरकारने दिल्या सूचना
महाराष्ट्रातील शाळा कोरोना काळामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद होत्या. त्या उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 17 ऑगस्टपासून शहरी आणि ग्रामीण भागातल्या शाळा विद्यार्थ्यांसाठी उघडल्या जाणार आहेत. यासंदर्भातली तारीख आधीच जाहीर झाली होती. सरकारने आता मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. काय आहेत मार्गदर्शक सूचना? 17 ऑगस्टपासून शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरक्षित […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील शाळा कोरोना काळामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद होत्या. त्या उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 17 ऑगस्टपासून शहरी आणि ग्रामीण भागातल्या शाळा विद्यार्थ्यांसाठी उघडल्या जाणार आहेत. यासंदर्भातली तारीख आधीच जाहीर झाली होती. सरकारने आता मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
काय आहेत मार्गदर्शक सूचना?
17 ऑगस्टपासून शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरक्षित पणे सुरू केले जातील
मुंबई, ठाणे या शहरांमधील कोव्हिडची परिस्थिती विचारात घेऊन संबंधित महापालिका आयुक्तांना याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार