Omicron Variant: 'पुढील महिना सर्वात धोकादायक', ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत शास्त्रज्ञांचा इशारा

Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंट हा पुढील आठवड्यात अधिक धोकादायक होण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
Omicron Variant: 'पुढील महिना सर्वात धोकादायक', ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत शास्त्रज्ञांचा इशारा
scientist warns on omicron variant next month will be most dangerous covid 19(फाइल फोटो, सौजन्य: AP)

Covid-19 Omicron cases: देशात आणि जगात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण (Omicron Variant Cases) हे सातत्याने वाढत आहेत. आतापर्यंत भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 161 रुग्ण (Omicron Cases Total India) सापडले आहेत. तसेच जगभरातील अनेक देशांमध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे.

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, डेन्मार्कमध्येही कोरोना विषाणूच्या या व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोनाच्या या व्हेरिएंटचे रुग्ण दुप्पट झाले आहेत. हे पाहता डेन्मार्कच्या स्टेट सिरम इन्स्टिट्यूटने ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, नवीन व्हेरिएंटची ही फक्त सुरुवात आहेत.

इन्स्टिट्यूटचेपाथ रोग तज्ज्ञ टायरा ग्रोव्ह कूस म्हणाले, 'येणारा पुढील महिना हा सर्वात धोकादायक असेल. या व्हेरिएंटबद्दल जास्त माहिती उपलब्ध होणार नाही. ही देखील भीती व्यक्त केली जात आहे की, डॅनिश रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या सतत वाढत जाईल. त्यामुळे रुग्णालयांवरील दबाव अधिक वाढणार आहे.'

टायरा ग्रोव्ह कुस यांनी सांगितले की, डेन्मार्कमधून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, लसीचे दोन डोस असोत किंवा एक, धोका सारखाच असेल. पण, ज्यांनी लसीचा बूस्टर डोस घेतला आहे. त्यांना कोरोना होण्याचा धोका कमी असेल. अशा स्थितीत जगभरातील अनेक देशांच्या नजराही डेन्मार्ककडे लागल्या आहेत.

गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील गोटेंग प्रांतात 24 नोव्हेंबर रोजी कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळून आला होता. ज्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी WHO ने ओमिक्रॉनला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणून घोषित केलं होतं.

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, सध्या जगातील चार डझनहून अधिक देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. डेन्मार्कच्या स्टेट सीरम इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञ टायरा ग्रोव्ह कुस यांनी सांगितले की, यावेळी जानेवारीमध्ये दररोज 500 हून अधिक रुग्ण समोर येऊ शकतात.

जर ओमिक्रॉन झपाट्याने पसरला आणि त्याचे स्वरूप डेल्टा व्हेरिएंटसारखे असेल तर केसेस 800 पेक्षा जास्त असू शकतात. डेन्मार्कमध्ये एका दिवसात कधीही 5 हजारांहून अधिक रुग्ण सापडले नव्हते. परंतु शुक्रवारी येथे एका दिवसात तब्बल 11 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. अशा स्थितीत या व्हेरिएंटने धोक्याची घंटा वाजवली आहे.

scientist warns on omicron variant next month will be most dangerous covid 19
Omicron variant symptoms: ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या लक्षणाबाबत समोर आली नवी माहिती

भारतातील नेमकी स्थिती काय? (India Omicron cases)

भारतातील 12 राज्यांमध्ये आतापर्यंत Omicron चे 161 रुग्ण आढळले आहेत. मात्र, यापैकी एकाही रुग्णाची प्रकृती गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर एकूण 42 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यनिहाय बोलायचे झाल्यास, महाराष्ट्र- 54, दिल्ली-32, तेलंगणा- 20, राजस्थान-17, गुजरात- 13, केरळ-11, कर्नाटक-8, उत्तर प्रदेशात 2 आणि तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये आणि चंदीगडमध्ये प्रत्येकी एक-एक केस आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in