अनाथांची माय काळाच्या पडद्याड! सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन
अनाथांची माय म्हणून जगाला परिचित असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन झालं. पुण्यातल्या गॅलेक्सी रूग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आत्तापर्यंत सिंधुताईंनी 1500 हून जास्त अनाथ मुलांचं संगोपन केलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. हृदयविकाराच्या झटक्याने रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. काय म्हणाले डॉ. शैलेश पुणतांबेकर? गॅलॅक्सी […]
ADVERTISEMENT

अनाथांची माय म्हणून जगाला परिचित असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन झालं. पुण्यातल्या गॅलेक्सी रूग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आत्तापर्यंत सिंधुताईंनी 1500 हून जास्त अनाथ मुलांचं संगोपन केलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. हृदयविकाराच्या झटक्याने रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
काय म्हणाले डॉ. शैलेश पुणतांबेकर?
गॅलॅक्सी केअर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, ‘सिंधुताई यांना छातीचा हार्निया झाला होता. त्यांच्यावर दीड महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होतो. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.’