‘मित्रपक्षानेच शिवसेनेवर आघात केला’; ‘धनुष्यबाणा’बद्दल शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

मुंबई तक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलेल्या विधानाचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नितीश कुमार यांच्य निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेत पडलेल्या फुटीवरून शरद पवार यांनी भाजपचा उल्लेख न करता गंभीर आरोप केला आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यावरून शरद पवारांनी शिंदेंना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलेल्या विधानाचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नितीश कुमार यांच्य निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेत पडलेल्या फुटीवरून शरद पवार यांनी भाजपचा उल्लेख न करता गंभीर आरोप केला आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यावरून शरद पवारांनी शिंदेंना सल्ला दिला आहे.

जेपी नड्डा, शिवसेना फूट आणि नितीश कुमारांच्या निर्णयावर शरद पवार काय म्हणाले?

“भाजपच्या अध्यक्षांनी (जेपी नड्डा) असं वक्तव्य केलं की, प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही. ते शिल्लक राहणार नाहीत आणि भाजप हा एकच पक्ष देशामध्ये शिल्लक राहिल. नितीश कुमारांची तक्रार तिच आहे. ही अकाली दलाची आणि इतर मित्र पक्षांचीही तक्रार आहे.”

‘भाजपनेच शिवसेना फोडली’; सुशील कुमार मोदींचं मोठं विधान, नितीश कुमारांना गर्भित इशारा

“भाजप त्यांच्यासोबत असलेल्या मित्र पक्षाला हळूहळू संपवतात. शिवसेना-भाजप एकत्र होते. शिवसेनेत दुरी कशी करता येईल अशी परिस्थिती निर्माण केली. शिवसेनेच्या मित्र पक्षाने सेनेवर आघात केला”, असं शरद पवार म्हणाले.

नितीश कुमार यांच्या भूमिकेबद्दल बोलताना पवार म्हणाले, “नितीश कुमार हे लोकांमध्ये मान्यता असलेला नेते आहेत. निवडणुकीत भाजप एकत्र येतं आणि मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घेतं. नितीश कुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आज भाजपचे नेते त्यांच्यावर (नितीश कुमार) टीकाटिप्पणी करत आहेत, परंतू नितीश कुमारांनी टाकलेलं पाऊल शहाणपणाचं आहे”, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांनी एकनाथ शिंदे काय सल्ला दिला?

शिवसेनेतील आमदारांबरोबर घेऊन मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेवरही ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या वादावर शरद पवार यांनी भूमिका मांडली. “धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही. जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल, तर वेगळा पक्ष काढू शकतात. जेव्हा मी काँग्रेसमधून बाहेर पडलो, तेव्हा वेगळा पक्ष काढला. वेगळं चिन्ह घेतलं. त्यांचं चिन्ह आम्ही मागितलं नाही. यातून वादविवाद वाढवणं योग्य नाही”, असं शरद पवार एकनाथ शिंदेंना म्हणाले.

शिंदे गटाने फडणवीसांच्या दोन्ही मांड्यांवर पापाचीच ओझी ठेवली; शिवसेनेनं काय म्हटलंय?

पवारांचा महागाईवरून केंद्रावर निशाणा; ‘उद्रेकांची स्थिती नाही, पण सावध राहण्याची गरज’

श्रीलंकेत एकाच कुटुंबाची सत्ता होती. राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री हे एकाच कुटुंबातील होते. श्रीलंकेत सत्तेचं केंद्रीकरण झालं. त्यामुळे असंतोष वाढायला लागला होता. त्यामुळे जनतेचा उद्रेक झाला. श्रीलंकेची जी परिस्थिती आहे, ती एका दिवसातली किंवा काही महिन्यातली नाही. काही वर्षातली आहे. बांगलादेशमध्ये जी परिस्थिती उद्धभवली आहे, ती पाकिस्तानमध्ये देखील उद्भवू शकते.”

नरेंद्र मोदी, मंत्रिमंडळाने नोंद घ्यायला हवी -शरद पवार

“आपल्या आजूबाजूला हे वातावरण आहे, याची नोंद आमच्या देशाच्या राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. विशेषतः नरेंद्र मोदींनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं नोंद घेण्याची गरज आहे. सत्ता केंद्रीत जिथे झाली, तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतात राष्ट्रीय पातळीवर सत्ता केंद्रीत होते की, काय याची शंका लोकांमध्ये निर्माण होते आहे. सध्या आपल्याकडे उद्रेक होण्याची स्थिती दिसत नाही, पण आपण सावध राहण्याची गरज आहे”, असं पवार म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp