शिवजयंतीच्या मिरवणुकांना परवानगी नाही, कोरोनामुळे सरकारचा निर्णय

मुंबई तक

कोरोना साथीच्या रोगांचं संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या शिवजयंतीबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शिवजयंतीचा उत्सव हा साधेपणाने साजरण्यात करण्यात यावा असे आदेश सरकारने जारी केले आहेत. तसेच यावेळी शासनाने कोणत्याही मिरवणुकांना देखील परवानगी नसल्याचं आपल्या आदेशात म्हटलं आहे. राज्य सरकार अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्नशील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोना साथीच्या रोगांचं संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या शिवजयंतीबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शिवजयंतीचा उत्सव हा साधेपणाने साजरण्यात करण्यात यावा असे आदेश सरकारने जारी केले आहेत. तसेच यावेळी शासनाने कोणत्याही मिरवणुकांना देखील परवानगी नसल्याचं आपल्या आदेशात म्हटलं आहे.

राज्य सरकार अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्नशील आहे. याच गोष्टींचा विचार करुन सरकारने शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकींना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शिवप्रेमींना यंदाची शिवजंयती अतिशय साधेपणाने साजरी करावी लागणार आहे.

पाहा यासंबंधी जारी केलेल्या परिपत्रकात नेमकं काय म्हटलं आहे?

छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा सण/उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार, दि. 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी दि. 19 फेब्रुवारी 2021 रोजी जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मार्गदर्श सूचना करण्यात येत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp