एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे : शिवसेना फुटीवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणार?

मुंबई तक

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडून तेच शिवसेना असल्याचा दावा केला जात आहे. हा सगळा वाद आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे जाऊन पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाशी संबंधित सर्व याचिकांवर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील उद्या (८ ऑगस्ट) होणारी सुनावणी काही दिवस पुढे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडून तेच शिवसेना असल्याचा दावा केला जात आहे. हा सगळा वाद आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे जाऊन पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाशी संबंधित सर्व याचिकांवर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील उद्या (८ ऑगस्ट) होणारी सुनावणी काही दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपसोबत युती करत शिंदे गटाने राज्यात सत्ता स्थापन केली. राज्यातील सत्ता मिळवल्यानंतर आता शिंदे गटाकडून शिवसेना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अचानक झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेतील वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी व न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश असलेल्या पीठासमोर या शिवसेना वादासंबंधित सर्व याचिकांवर सुनावणी सुरू आहे.

“घाईने मधुचंद्र आटोपला! लग्नच करायचे विसरले..” शिंदे-फडणवीस सरकारवर शिवसेनेची टीका

हे वाचलं का?

    follow whatsapp