shiv sena faction : उद्धव ठाकरेंना दिलासा! सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं?
शिंदे गट विरुद्ध शिवसेना वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायालयाने शिंदे गट, शिवसेना आणि निवडणूक आयोगाचं म्हणणं ऐकून घेतलं. या प्रकरणावरील पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. मात्र, निवडणूक आयोगात असलेल्या प्रकरणात शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. शिंदे गट विरुद्ध शिवसेना : सर्वोच्च न्यायालयात काय घडलं? युक्तिवाद समजून घेण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा शिंदे गट […]
ADVERTISEMENT

शिंदे गट विरुद्ध शिवसेना वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायालयाने शिंदे गट, शिवसेना आणि निवडणूक आयोगाचं म्हणणं ऐकून घेतलं. या प्रकरणावरील पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. मात्र, निवडणूक आयोगात असलेल्या प्रकरणात शिवसेनेला दिलासा मिळाला आहे.
शिंदे गट विरुद्ध शिवसेना : सर्वोच्च न्यायालयात काय घडलं? युक्तिवाद समजून घेण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (शिवसेना) या दोन्ही पक्षांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलेली आहेत. लिखित युक्तिवादही पीठाकडून समजून घेतला जाणार आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी सोमवारी (८ ऑगस्ट) होणार असून, हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवायचं की नाही, याबद्दल सोमवारीच निर्णय घेतला जाईल, असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या आजच्या सुनावणीवेळी कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी पक्षांतरबंदी कायद्यावर बोट ठेवत आमदारांवरील अपात्रतेची कारवाई हा मूळ मुद्दा असल्याचं न्यायालयाला सांगितलं. तर शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी आम्ही शिवसेनेतच असल्याचा पुनरुच्चार न्यायालयात केला. त्याचबरोबर पक्षाच्या व्हीप विरोधात जाऊन मतदान केल्यास वा पार्टी सोडल्यानंतर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असंही ते म्हणाले.
आजच्या सुनावणीत शिवसेनेच्या निवडणूक आयोगासमोर असलेल्या प्रकरणाचा मुद्दा समोर आला. निवडणूक आयोगाच्या वतीने दातार यांनी बाजू मांडली.