दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदेंचं ट्विट चर्चेत, घराणेशाहीवरून उद्धव ठाकरेंवर टीका
शिवसेना दुभंगल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत दोन मेळावे पार पडत आहेत. एक मेळावा शिवाजी पार्क मैदानावर तर दुसरा मेळावा बीकेसी मैदानावर होतो आहे. एकनाथ शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे हा सामना रंगणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी मेळाव्याच्या काही वेळ आधीच एक ट्विट केलं आहे ज्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. […]
ADVERTISEMENT

शिवसेना दुभंगल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत दोन मेळावे पार पडत आहेत. एक मेळावा शिवाजी पार्क मैदानावर तर दुसरा मेळावा बीकेसी मैदानावर होतो आहे. एकनाथ शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे हा सामना रंगणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी मेळाव्याच्या काही वेळ आधीच एक ट्विट केलं आहे ज्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
काय आहे एकनाथ शिंदे यांनी केलेलं ट्विट?
” मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे “- हरिवंशराय बच्चन
माझी मुलं ही माझी मुलं आहेत म्हणून माझे उत्तराधिकारी नसतील तर जे माझे उत्तराधिकारी असतील ती माझी मुलं असतील या आशयाच्या हरिवंशराय बच्चन यांच्या ओळी एकनाथ शिंदे यांनी ट्विट केल्या आहेत. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवर घराणेशाहीवरून निशाणा साधणार हेच या ओळी सांगत आहेत.
” मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे “- हरिवंशराय बच्चन.#विचारांचेवारसदार
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 5, 2022
एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडणार आहे
एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यासाठी बीकेसीचं मैदान निवडलं आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून लोक येत आहेत. त्याचप्रमाणे शिवाजी पार्क मैदानावरही लोक येत आहेत. शिवसेना दोन गटांमध्ये विभागाली गेल्यापासून हा पहिलाच मेळावा आहे. अशात दोन्ही नेते म्हणजेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय काय बोलणार? आरोपांच्या कोणत्या फैरी एकमेकांवर झाडणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.










