व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या सांगलीच्या टोळीतल्या सहा जणांना कोल्हापुरात अटक

व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या सांगलीच्या टोळीतल्या सहा जणांना कोल्हापुरात अटक

सांगली जिल्ह्यात व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणारी टोळी सक्रिय झाली होती. याबाबत कोल्हापूर वन विभागाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून या टोळीला कोल्हापुरात बोलावून घेतलं. न्यू पॅलेस परिसरात सापळा रचून या टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील सव्वातीन कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी, पाच मोबाईल, दोन दुचाकी आणि चारचाकी असं 3 कोटी 50 लाखाचं साहित्य जप्त करण्यात कोल्हापूर वन विभागातील कर्मचार्‍यांना यश आलं.

व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या सांगलीच्या टोळीतल्या सहा जणांना कोल्हापुरात अटक
ठाणे : व्हेल माशाची उलटी विकण्याचा प्रयत्न करणारे दोन जण जेरबंद

व्हेल माशाची उलटी म्हणजे काय एवढी किंमत...?

जीवसृष्टीत समुद्रात आहे यामध्ये विविध जलचर पाहण्यास मिळतात पण एखाद्या प्राण्याची उलटी केल्यास आपल्याला केल्यास किळस वाटते. व्हेल माशाच्या पोटात न पचलेले अन्न काही वेळा उलटी च्या रूपात बाहेर पडते राखाडी रंगाचे बनते तरंगत समुद्रकिनारी पोहोचते त्याला तरंगले सोने सुद्धा म्हणतात. त्याची किंमत कोट्यावधी रुपये असते त्याचा उपयोग अत्तर परफ्युम, कामोत्तेजक औषधे यामध्ये केला जातोय. ज्या ठिकाणी व्हेल मासा दिसतो तिथे मच्छिमारांची नजर या उलटीवर असते भारतात इतर किनारपट्टी प्रमाणे कोकण किनारपट्टीवर काही काळापासून व्हेल मासा आढळत आहे. व्हेल मासा समुद्र किनाऱ्यापासून खूप दूर असतो उलटी सारखा हा भाग किनाऱ्यावर येण्यासाठी साधारण एक वर्षाचा कालावधी लागतो.

सांगली जिल्ह्यात व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती कोल्हापूर वनविभागाला मिळाली होती. या टोळीला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी टोळीतील प्रमुखांशी संपर्क साधला. माशाची उलटी विकत घेण्यासाठी कोल्हापुरातील काही व्यक्ती इच्छुक असल्याचं भाटे यांनी सांगितलं. गेल्या दोन दिवसांपासून भाटे या टोळीच्या संपर्कात होते.

त्यानंतर आज उलटी खरेदी करण्यासाठी या टोळीला कोल्हापुरात बोलावण्यात आलं होतं. दसरा चौकात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी वनक्षेत्रपाल आर. एस. कांबळे हे ग्राहक बनून गेले. त्यांनी टोळीतील मुल्ला याला आपल्याकडील बॅगेतील पैसे दाखवले. पैसे पाहिल्यानंतर संशयीतानं आपल्या टोळीतील इतर सदस्यांना व्हेल माशाची उलटी घेवून कोल्हापूर रमणमळा,न्यू पॅलेस परिसरात बोलावलं. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे नेताजी डोंगरे, उत्तम सडोलीकर, रणजित कांबळे, वैशाली पाटील यांनी न्यू पॅलेस परिसरात, सापळा लावला आणि व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयित विश्वनाथ नामदास, आलमशाह मुल्ला, उदय जाधव, रफिक सनदी, किस्मत नदाफ, अस्लम मुजावर यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडील सव्वातीन कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त केली. त्यांच्याकडील किमती चारचाकी, दुचाकी, पाच मोबाईल असं सुमारे 50 लाखाचं साहित्य जप्त केलं. या आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर उभं करण्यात येणार आहे. ही कारवाई उप वन संरक्षक आर. आर.काळे,सहाय्यक वनसंरक्षक सुनील निकम, नवनाथ कांबळे, विजय पाटील, संदीप शिंदे, आर.एस.मुल्लाणी, एस.एस.हजारे, पोलीस कर्मचारी प्रदीप भोसले यांचा सहभाग होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in