ओमिक्रोन व्हेरिएंट: ‘या’ जिल्ह्यात नव्याने निर्बंध लागू, कोरोना संकटाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात धास्ती
विजयकुमार बाबर, सोलापूर कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ‘ओमिक्रोन’ने आता अवघ्या महाराष्ट्राची धास्ती वाढली आहे. दुसरी लाट येऊ गेल्यानंतर आता हळूहळू जीवन पूर्वपदावर येत आहे. अशातच ओमिक्रोन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. दरम्यान, हे संकट लक्षात घेता सोलापूर जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली असून सर्व कार्यक्रमावर कडक बंधने घालण्यात आली आहेत. सोलापूर जिल्ह्यात अद्याप 10 लाख लोकांचे […]
ADVERTISEMENT

विजयकुमार बाबर, सोलापूर
कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ‘ओमिक्रोन’ने आता अवघ्या महाराष्ट्राची धास्ती वाढली आहे. दुसरी लाट येऊ गेल्यानंतर आता हळूहळू जीवन पूर्वपदावर येत आहे. अशातच ओमिक्रोन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. दरम्यान, हे संकट लक्षात घेता सोलापूर जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली असून सर्व कार्यक्रमावर कडक बंधने घालण्यात आली आहेत.
सोलापूर जिल्ह्यात अद्याप 10 लाख लोकांचे लसीकरण बाकी असून लस घेणाऱ्या नागरिकांनाच शासकीय कार्यालयात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.
देशासमोर नव्याने उभे ठाकलेल्या ओमीक्रोन व्हेरिएंट संकटाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन कडक निर्बंधाचा निर्णय घेतला आहे. जिल्हातील सर्व कार्यक्रमांला निर्बंध घालून दिले आहेत. तसेच दोन्ही लसीकरण पूर्ण करणाऱ्या नागरिकांनाच सरकारी कार्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.