सोलापूर: ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं अन्.. भीषण अपघातात कारचा चक्काचूर, 4 तरुण जागीच ठार

Solapur Accident: सोलापूरनजीक कवठे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सोलापूर: ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं अन्.. भीषण अपघातात कारचा चक्काचूर, 4 तरुण जागीच ठार
solapur driver loses control and car hits bridge car crashes in horrific accident 4 youths killed on the spot

विजयकुमार बाबर, सोलापूर: सोलापूर-विजयपूर रोडवर झालेल्या एका भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. विजयपूरहून सोलापूरकडे येत असताना एका कारचा भीषण अपघात झाला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला असल्याचं समजतं आहे.

नेमका अपघात कसा झाला?

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातील विजयपूरहून सोलापूरकडे येत असताना कवठे गावाजवळील ब्रिजला जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. ज्यामध्ये गाडीतील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पाहटेच्या सुमारास भरधाव चालल्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.

अपघातातील मृतांची

या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या अपघातातील मृतांची नावं.

  1. अरुण कुमारलक्ष्मण एनकंची (वय 21 वर्ष)

  2. महबूब महम्मदअली मुल्ला (वय 18 वर्ष)

  3. फिरोज सैपनसाब शेख (वय 20 वर्ष)

  4. मुन्ना केंभावे (वय 21 वर्ष)

कार अपघातातील हे चारही मृत विजापूरमधील यरगल केंडी या गावचे रहिवासी होते.

कार क्रमांक KA-32-2484 ने एकूण पाच जणं काही कामानिमित्त विजापूरहून सोलापूरला येत होते. पण कार सोलापूरजवळील कवठे गावाजवळ अली असता ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची नवीन ब्रिजला जोरात धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की, ज्यामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. तर चौघे जण हे जागीच ठार झाले. यामधील एक जण गंभीर जखमी आहे.

solapur driver loses control and car hits bridge car crashes in horrific accident 4 youths killed on the spot
मुंबई-पुणे महामार्गावर प्रवासी बसचा अपघात, तीन कामगारांचा मृत्यू

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आर. ए. जाधव यांनी पाच जणांना तात्काळ पहाटे 4 वाजता शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र चौघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

तर या अपघातातील गंभीर जखमी असलेल्या एका तरुणाला छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं असून सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं आहे. या अपघाताप्रकरणी सिव्हील पोलीस ठाण्यात प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in