Maharashtra Health Card : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारकडून आरोग्य व्यवस्थेत वाढ
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून आरोग्य व्यवस्थेवर चांगलाच ताण येतो आहे. १ मे पासून देशात लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होणार असला तरीही पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यामुळे राज्यात १ मे पासून लसीकरणाला सुरुवात होणार नाहीये. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत आरोग्य सुविधेत राज्य सरकार […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून आरोग्य व्यवस्थेवर चांगलाच ताण येतो आहे. १ मे पासून देशात लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होणार असला तरीही पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यामुळे राज्यात १ मे पासून लसीकरणाला सुरुवात होणार नाहीये. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत आरोग्य सुविधेत राज्य सरकार कशा पद्धतीने वाढ करत आहे याची माहिती दिली.
गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा, बेड्सची कमतरता अशा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. परंतू या सर्व गोष्टींवर मात करत राज्य सरकारने गेल्या वर्षाच्या तुलनेत आरोग्य व्यवस्थेत उल्लेखनीय वाढ केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
वर्षभरात राज्यातील आरोग्य व्यवस्थेत उल्लेखनीय वाढ, जाणून घ्या राज्याचं Health Card –
RTPCR चाचण्यांसाठी प्रयोगशाळा –










