घटस्थापनेच्या मुहुर्तावर विठूमाऊलीचं दार भक्तांसाठी खुलं, दररोज १० हजार भाविकांना मिळणार दर्शन

मुंबई तक

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आणि समस्त वारकरी संप्रदायासाठी महत्वाचं स्थान असलेल्या श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत घटस्थापनेच्या मुहुर्तावर मंदिर भक्तांसाठी खुलं झाल्यानंतर कराव्या लागणाऱ्या नियोजनावर चर्चा झाली. कोविडच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करुन प्रत्येत दिवशी फक्त १० हजार भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आणि समस्त वारकरी संप्रदायासाठी महत्वाचं स्थान असलेल्या श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत घटस्थापनेच्या मुहुर्तावर मंदिर भक्तांसाठी खुलं झाल्यानंतर कराव्या लागणाऱ्या नियोजनावर चर्चा झाली.

कोविडच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करुन प्रत्येत दिवशी फक्त १० हजार भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना कोविडची चाचणी करणं गरजेचं नसलं तरीही थर्मल स्क्रिनींग आणि ऑक्सिजनची तपासणी केल्यानंतरच त्यांना आत सोडलं जाईल अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

साईबाबा मंदिर होणार खुलं; कुणाला दिला जाणार प्रवेश?, दर्शनासाठीची नियमावली जाहीर

घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन भाविकांना मिळणार आहे . विजया दशमी पासून सकाळी सहा ते सात या वेळेमध्ये पंढरपूर मधील स्थानिक भाविकांना दर्शन दिले जाणार आहे . तर सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने भाविकांना दर्शन दिले जाणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp