मुलांनो वेळेचं गणित पाळा ! परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचल्यास प्रवेश मिळणार नाही

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. कोरोना काळात पहिल्यांदाच राज्यामध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत. अनेकदा काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी उशीर होतो. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांना उशीरा येण्याचं कारण जाणून घेत १० मिनीटांची सूट देण्यात येते. परंतू या सवलतीचा लाभ घेत राज्यात काही ठिकाणी परीक्षाकेंद्रावर गैरप्रकार होत असल्याचं लक्षात येताच, राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना देण्यात येणारी ही सवलत रद्द केली आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक विद्यार्थ्याला दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रावर पोहचणं अनिवार्य असणार आहे.

ADVERTISEMENT

राज्यात बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल तर दहावीची परीक्षा ही १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. यंदा कोरोनामुळे लेखी परीक्षा ही दोन सत्रांमध्ये पार पडत असून सकाळचा पेपर हा साडेदहा वाजता तर दुपारचा पेपर हा तीन वाजता सुरु होणार आहे. दोन्ही सत्रांमध्ये उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १० मिनीटांचा वेळ राखून ठेवण्यात आला होता. उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना कारण विचारून त्यांना पेपरला बसायची संधी देण्याचे अधिकार हे केंद्रसंचालकांकडे देण्यात आले होते.

परंतू या सवलतीचा गैरफायदा घेत राज्यात काही ठिकाणी मोबाईलमध्ये गैरमार्गाने प्रसारित झालेल्या पेपरची कॉपी घेऊन परीक्षेला येण्याचे प्रकार उघडकीस आले. त्यामुळे शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना दिलेली १० मिनीटांची सवलत रद्द केली असून सर्व विद्यार्थ्यांना पेपर सुरु होण्याआधी १ तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं बंधनकारक करण्यात आलंय. तसेच सकाळच्या सत्रात १० वाजून २० मिनीटांनी तर दुपारच्या सत्रात २ वाजून ५० मिनीटांनी प्रश्नपत्रिका वाटताना वर्गात उपस्थित राहणं बंधनकारक करण्यात आलंय. परंतू जे विद्यार्थी ही वेळ पाळणार नाहीत त्यांना परीक्षाकेंद्रात प्रवेश न देण्याचे आदेश राज्य शिक्षण मंडळाने दिले आहेत.

हे वाचलं का?

राज्यात बोर्डाच्या परीक्षेत कॉपीबहाद्दरांवर आळा बसावा यासाठी बोर्डाने दक्षता आणि भरारी पथकांची स्थापना केली आहे. तरीही कॉपीचे प्रकार अजुनही सुरुच आहेत. जालना जिल्ह्यातील मंठा शहरात परीक्षा केंद्राबाहेर मराठीच्या पेपरदरम्यान विद्यार्थ्यांना कॉपी पुरवतानाचा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळेच अशा घटनांवर आळा घालण्यासाठी बोर्डाने ही सवलत रद्द केल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT