ऑक्सिजनचा टँकर वेळेत पोहचलाच नाही, 11 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तिरुपती: आंध्रप्रदेशच्या तिरुपतीमध्ये एका रुग्णालयात ऑक्सिजनचा टँकर योग्य वेळेत न पोहचल्याने तब्बल 11 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिरुपतीचे जिल्हाधिकारी एम. हरी नारायण यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, मृतांचा हा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.

नाशिकच्या रूग्णालयात Oxygen ची गळती, 22 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, एक ऑक्सिजन टँकर हा रुग्णालयात वेळेवर पोहचू शकला नाही आणि त्याचवेळी रुग्णालयातील ऑक्सिजन देखील संपल्याने रुग्णांना हकनाक आपला जीव गमवावा लागला. या रुग्णालयात एकूण 135 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘माझी आई तडफडून मेली, अख्ख्या वॉर्डमधील सगळे पेशंट संपले’, नातेवाईकांचा आक्रोश

या घटनेनंतर काही व्हीडिओ हे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांची प्रकृती बिघडली आणि त्यातच काही जणांचा मृत्यू देखील झाला. दरम्यान, या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

नाशिकमध्ये देखील ऑक्सिजनच्या गळतीमुळे गमवावे लागले होते 22 जणांना आपले प्राण:

ADVERTISEMENT

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या झाकीर हुसैन रूग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली होती. या दुर्घटनेत तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला होता. अशाप्रकारे रुग्णांना प्राण गमवावे लागल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला होता. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत असताना नाशिकच्या झाकीर हुसैन रूग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली होती. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो रूग्णालय परिसरात सगळीकडे पसरला. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा ते पाऊण तास खंडीत झाला होता. जो नंतर पूर्ववत करण्यात आला. पण तोवर 22 रुग्ण हे हकनाक दगावले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT