मोठी बातमी… तब्बल 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान, C-60 फोर्सची मोठी कारवाई

मुंबई तक

गडचिरोली: गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातून आत्ताच्या क्षणाला एक मोठी बातमी समोर आली आहे. आज (21 मे) गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्र अंतर्गत पयडी जंगलात नक्षलवादी (Naxals) आणि पोलिसांच्या (Police) चकमकीत तब्बल 13 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. C 60 फोर्सने 13 नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून अद्यापही सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गडचिरोली: गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातून आत्ताच्या क्षणाला एक मोठी बातमी समोर आली आहे. आज (21 मे) गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्र अंतर्गत पयडी जंगलात नक्षलवादी (Naxals) आणि पोलिसांच्या (Police) चकमकीत तब्बल 13 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. C 60 फोर्सने 13 नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून अद्यापही सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील यांनी ‘मुंबई तक’ला दिली आहे.

गडचिरोलीच्या गोंदिया रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी या ऑपरेशनच्या वृत्ताला दुजोरा दिला असून हे अद्यापही काही नक्षलवादी हे कोटमी जंगलात लपून बसलेली असल्याची शंका आहे. त्यामुळेच पोलिसांकडू शोध मोहीम सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच अलर्ट मोडवर राहून हे ऑपरेशन सुरु आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील कोटमी हा जंगल परिसर छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागूनच आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचा वावर असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. दरम्यान, आज देखील या भागात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात जमा होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे याच माहितीच्या आधारे पहाटेच्या सुमारास पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरु केलं. याच ऑपरेशनदरम्यान, अचानक नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. त्यामुळे C-60 फोर्सच्या टीमकडून देखील गोळीबार करण्यात आला. या भागात अनेक तास दोन्ही बाजूने गोळीबार सुरुच होता.

नक्षलवादी भागातील तरुणांना पोलिसांच्या मदतीने मिळणार नोकऱ्या

हे वाचलं का?

    follow whatsapp