अल्पवयीन बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न करत होता शेजारी, १४ वर्षाच्या भावाने बहिणीची केली सुटका
मुंबईत १४ वर्षाच्या भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या शेजाऱ्याला पकडून दिलं आहे. मुंबईच्या जुहू परिसरात ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणात वेळेत पावलं उचलत आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर POSCO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ वर्षाची पीडित मुलगी आणि […]
ADVERTISEMENT
मुंबईत १४ वर्षाच्या भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या शेजाऱ्याला पकडून दिलं आहे. मुंबईच्या जुहू परिसरात ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणात वेळेत पावलं उचलत आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर POSCO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ वर्षाची पीडित मुलगी आणि तिचा १४ वर्षाचा भाऊ ही घटना घडली तेव्हा घरात एकटे होते. मुलांचे आई-वडील कामावर गेले होते. घरच्या केबल कनेक्शनमध्ये बिघाड झाल्यामुळे पीडित मुलगी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडे मदत मागण्यासाठी गेली. आरोपीने यावेळी मुलीला घरात घेऊन दार आतून बंद केलं. आरोपीने स्वतःचे आणि मुलीचे कपडे काढून तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायला सुरुवात केली. पीडित मुलगी यावेळी आरोपीला थांबवत होती.
यावेळी इतक्यात मुलीचा भाऊ तिकडे आला आणि त्याने वेळेत हा प्रकार थांबवत आपल्या बहिणीला सांभाळलं. आई घरी आल्यानंतर दोन्ही भावांनी घडलेला प्रकार तिच्या कानावर घातला, ज्यानंतर मुलीच्या पालकांनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जुहू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय म्हसवेकर यांच्या पथकाने प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा नोंदवण्याची प्रक्रीया सुरु असताना आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी वेळेत केलेल्या कारवाईमुळे आरोपीला पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT