मुंबईत १९ वर्षांच्या महिलेवर तीन महिने सामूहिक बलात्कार, खळबळजनक घटना उघड
मुंबईतल्या कुर्ला या उपनगरात एका १९ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये महिलेच्या बहिणीच्या नवऱ्याचाही समावेश आहे. या प्रकरणातल्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही मूळची कोलकाता येथील आहे. […]
ADVERTISEMENT
मुंबईतल्या कुर्ला या उपनगरात एका १९ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये महिलेच्या बहिणीच्या नवऱ्याचाही समावेश आहे. या प्रकरणातल्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही मूळची कोलकाता येथील आहे. काही महिन्यांपूर्वी ती मुंबईत आली होती. त्यावेळी तिच्या बहिणीच्या नवऱ्याने तिला कुर्ला या ठिकाणी एका खोली मालकाकडे नेलं. त्या भागात काही भिकारीही भाडे तत्त्वावर घर घेऊन राहात होते. याच घरातल्या भिकाऱ्यांकडून पैसे घेऊन पीडित महिलेच्या भावोजीने पीडित महिलेला त्यांच्या स्वाधीन केलं. एवढंच नाही तर पीडित महिलेच्या बहिणीच्या नवऱ्यानेही तिच्यावर बलात्कार केला.
पुण्यात 21 वर्षीय महिलेवर एकाच दिवशी दोनदा बलात्कार; आरोपी अटकेत
हे वाचलं का?
पीडित महिला शहरात नवीन असल्याने आणि तिच्यासोबत हा प्रकार घडल्याने घाबरून गेली होती. तिने याविषयी कुणाला काहीही सांगितलं नाही. काही दिवसांनी ही पीडित महिला गरोदर असल्याची बाब उघड झाली. त्यानंतर या महिलेने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेच्या बहिणीच्या नवऱ्यासह चार जणांना अटक केली आहे. यातला एक जण फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पाचवा आरोपी पश्चिम बंगालमध्ये पळाल्याचं कळतं आहे.
गोव्यातल्या अरंबनोल बीचवर ब्रिटिश महिलेवर बलात्कार, आरोपी अटकेत
ADVERTISEMENT
बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींच्या विरोधात PITA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी या सगळ्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं.
ADVERTISEMENT
मुंबई प्रमाणेच पुण्यातही बलात्काराची एक घटना समोर आली आहे. एका ट्रॅव्हल्स चालकानं स्वारगेट परिसरात महिलेचं अपहरण केलं आहे.
मैत्रिणीच्या वडिलांनीच केला बलात्कार, मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
एवढंच नाही तर अपहरण करून आरोपीनं महिलेवर बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. ट्रॅव्हल चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. खोलीच्या शोधात असताना ट्रॅव्हल्समध्ये झोपण्यास सांगून ट्रॅव्हल्स सुरू करून कात्रज परिसरात नेली आणि तेथे बलात्कार केला. या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बस चालक नवनाथ शिवाजी भोग (वय ३८) आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT